आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​सानिया मिर्झा-शोएब मलिकला पुत्ररत्न, बेबी मिर्झा मलिकचे झाले आगमन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सानियाने मंगळवारी पहाटे गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शोएब मलिकने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शोएब मलिकने आज सकाळी साडेसात वाजता ट्विटरवर सानिया आई झाल्याची गोड बातमी दिली. “कळवताना अतिशय आनंद होतोय, मुलगा झाला आणि सानियाची प्रकृती उत्तम असून नेहमीप्रमाणे खंबीर आहे, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभार,” असे शोएबने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

 

Excited to announce: Its a boy, and my girl is doing great and keeping strong as usual #Alhumdulilah. Thank you for the wishes and Duas, we are humbled 🙏🏼 #BabyMirzaMalik 👼🏼

— Shoaib Malik 🇵🇰 (@realshoaibmalik) October 30, 2018

 

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सानियाने, आपल्या मुलाचे नाव मिर्झा मलिक असे ठेवणार असल्याचे सांगितले होते . माझ्या आणि शोएबच्या नावाने माझे मुल भविष्यात ओळखले जावे अशी माझी इच्छा असल्याचे सानियाने म्हटले होते. 31 वर्षीय सानिया मिर्झाने 2010 साली पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला होता. हैदराबादमध्ये पारंपरिक पाकिस्तानी पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला होता. लग्नाच्या 8 वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलला आहे.

बातम्या आणखी आहेत...