आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Sania Mirza Reaction On Shoaib Malik's Retirement, Sania Tweets, Proud Of Everything You've Achieved

शोएब मलिकच्या निवृत्तीवर पत्नी सानिया मिर्झाची प्रतिक्रीया, ट्वीटमध्ये लिहीले- 'प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो...'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- पाकिस्तानी क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्जाचा पती शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विश्वचषक 2019 मध्ये पाकिस्तान आणि बांग्लादेश सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फ्रंसमध्ये त्याने याबाबत घोषणा केली. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशला 94 रनने पराभूत केले. पण शोएब सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फ्रंसमध्ये तो म्हणाला,'मला हा फॉर्मेट सोडताना खूप दुःख होत आहे. पण आता मला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे.' त्याच्या नवृत्ती नंतर पत्नी सानियाने ट्वीट करून त्याला प्रोत्साहीत केले.


सानियाने ट्वीट केले- 'प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतोच...'

पती शोएबसाठी सानियाने लिहीले, 'प्रत्येक गोष्टी एक शेवट असतो, पण आयुष्यात प्रत्येक शेवटासोबत एक नवीन सुरुवात होत असते. शोएब मलिक तू गर्वाने 20 वर्षे आपल्या देशासाठी खेळलास. तू जे काही मिळवलस त्यावर इजहान आणि मला गर्व आहे.' 


शोएब मलिकचे वन-डे करिअर
मॅच- 287
रन- 7534, सरासरी- 34.55
शतक- 9, अर्धशतक- 44
विकेट- 158, बेस्ट- 4/19

डेब्यू- Vs विंडीज (14 ऑक्टोबर 1999)
शेवटचा वन-डे- Vs भारत (16 जून 2019)

बातम्या आणखी आहेत...