आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ind vs Pak सामन्यापूर्वी ट्रोल्सला वैतागली सानिया मिर्झा; म्हणाली, किमान प्रेग्नेंट महिलेला तरी सोडा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तानचा बहुप्रतीक्षित सामना बुधवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर टेनिस स्टार सानिया मिर्झाला ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोल्समुळे सानिया इतकी वैतागली की तिने नेटिझन्सला प्रत्युत्तर दिले. हा केवळ एक क्रिकेट सामना असून किमान प्रेगनेंट महिलेला एकटी सोडा असे आवाहन तिने केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या सामन्यात सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक सुद्धा पाकिस्तानी संघाकडून खेळत आहे. भारतीय टेनिस स्टार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात आपल्या पतीला चिअर करते की देशाला अशा प्रकारचे प्रश्न विचारून तिला नेहमीच ट्रोल केले जाते. परंतु, यावेळी सानियाने सर्वांना उत्तर दिले आहे. 


भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच सानिया मिर्झाला सोशल मीडियावर विचित्र प्रतिक्रिया मिळाल्या. यावरून ती वैतागली होती. त्यामुळेच, तिने तिची थट्टा मस्करी करणाऱ्यांना उत्तर देताना लिहिले, "मॅच सुरू होण्यासाठी 24 तास सुद्धा राहिलेले नाहीत. अशात काही दिवस सोशल मीडियावरून साइन आउट करणेच योग्य ठरेल. काही लोक एका सामान्य व्यक्तीला सुद्धा आजारी करू शकतात. एका प्रेगनेंट महिलेला तरी किमान एकटी सोडा. हा केवळ एक क्रिकेट सामनाच आहे." सानियाच्या या मेसेजचे अनेकांनी समर्थन केले. 

 

Soo less than 24hrs to go for this match,safe to sign out of social media for a few days since the amount of nonsense thts gonna b said here can make a ‘regular’ person sick ,let alone a pregnant one🙄Later guys!Knock yourselves out!BUT remember-ITS ONLY A CRICKET MATCH! Toodles!

— Sania Mirza (@MirzaSania) September 18, 2018

bhabhi indians ko hosla dete hoye, its just a cricket match rona dhona na shoro kr dena...#PakvsInd #asiacup https://t.co/yp1aVc3G90

— Shahmeer ALi🔹 (@Shaaahmir) September 19, 2018

 

बातम्या आणखी आहेत...