आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया दोन वर्षांनी टेनिस कोर्टवर; क्वार्टर फायनलमध्ये मारली धडक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही सानियाची दाेन वर्षांनी पहिला डब्ल्यूटीए स्पर्धा आहे
  • क्वार्टर फायनलमध्ये सानियाचा सामना अमेरिकन वानिया किंग-क्रिस्टिना मॅक्हालेशी होईल

हाेबार्ट - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने कोर्टवर विजयी पुनरागमन केले. सानिया व तिची युक्रेनची सहकारी नादिया किचेनोकने होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. ही सानियाची दाेन वर्षांनी पहिला डब्ल्यूटीए स्पर्धा आहे. सानिया-नादियाने जॉर्जियाच्या ओकासाना कलाशनिकोवा-जपानच्या मियू कातोला २-६, ७-६, १०-३ ने हरवले. सानिया-नादियाने एक तास ४१ मिनिटांत विजय मिळवला. क्वार्टर फायनलमध्ये सानियाचा सामना अमेरिकन वानिया किंग-क्रिस्टिना मॅक्हालेशी होईल. अमेरिकन जोडीने जॉर्जिना गार्सिया पेरेज-सोरा सोरिबेस तोरमो या स्पॅनिश जोडीचा ६-२, ७-५ ने पराभव केला.
विजयानंतर सानियाने म्हटले, “हा माझा जीवनातील महत्वाचा दिवस आहे. या सामन्यादरम्यान कुटुंब व मुलगा मला प्रोत्साहन देत होता. मी हा सामना जिंकला. सर्वांचे आभार मानते.’ सामन्यात सानिया व नादियाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी दोन वेळा डबल फॉल्ट केले. ही जोडी सात ब्रेक पॉइंटपैकी एकही जिंकू शकली नाही. त्यांनी पहिला सेट गमावला. दुसऱ्या सेटमध्ये दोघींनी पुनरागमन केले आणि ३-३ ब्रेक पाॅइंट मिळवले. 
 यापूर्वी सानियाने अखेरची स्पर्धा ऑक्टोबर २०१७ मध्ये चायना ओपन खेळली होती. त्यानंतर गुडघ्याची दुखापत झाली. ३३ वर्षीय सानियाने एप्रिल २०१८ मध्ये बाळंतपणासाठी खेळातून विश्रांती घेतली होती. तिने ऑक्टोबरमध्ये मुलगा इजहानला जन्म दिला.