आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sania Removes Sweet Foods From Her Meal After Becoming A Mother, 5 Hours Daily In The Gym, 100 Minutes Cardio, One Hour Kick Boxing

आई झाल्यावर सानियाने जेवणातून हटवले गोड पदार्थ, 5 तास रोज जिममध्ये, 100 मिनिटे कार्डियो, एक तास किक बॉक्सिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर या आठवड्यात पुनरागमन करतेय सानिया मिर्झा, हा कालावधी कसा गेला हे सांगतेय
  • दिव्य मराठीला सांगितले- झोपण्याची वेळ अनिश्चित तरीही सकाळी 7 वा. उठते

​​​​​​मुंबई : भारताची टेनिस स्टार आणि सहा वेळची ग्रँडस्लॅम विजेती सानिया मिर्झा दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करतेय. ३३ वर्षांची सानिया ११ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिश्र दुहेरीतून टेनिस कोर्टवर पुनरागमन करतेय. सानियाने दिव्य मराठीला सांगितले की, 'मोठ्या खंडानंतर पुनरागमन होत आहे, यामुळे उत्सुक आहे. आई झाल्यानंतर पहिल्यांदाच स्पर्धेत उतरत आहे. मी आता रोज सुमारे पाच तास टेनिस बॉलने सराव करत आहे. प्रसूतीनंतर मी डाएटवर लक्ष दिले आहे. मी सुरुवातीला माझ्या डाएटमधून साखर वगळली होती. मात्र, माझा ध्यानावर विश्वास आहे. खरे सांगता मला जे काही आवडते ते सर्व काही खाते. बाळामुळे झोपण्याची वेळ नक्की नाही. तरीही सकाळी ७ वाजता उठते. प्रसूतीदरम्यान वजन २३ किलो वाढले होते. आता मी वजन २६ किलोने घटवले आहे.' सानियाचे पुनरागमन सोपे नव्हते. प्रसूतीनंतर तिने पुन्हा फिट होण्यास सुरुवात केली असता रोज सुमारे पाच तास व्यायाम करायची. सुमारे १०० मिनिटे कार्डिओ एक्झरसाइज करायची, नंतर एक तास किक बाॅक्सिंग करते.

या महिला खेळाडूंचे पुनरागमनही चर्चेत राहिले

सेरेना : गरोदरपणात जिंकली आॅस्ट्रेलियन ओपन

अमेरिकेची टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने प्रसूतीनंतर डाएटमध्ये जास्त बदल केला. डाएटमध्ये क्लीन फूड सामूल केले. नारळाच्या तेलात बनवलेले जेवण खाल्ले. कच्चे धान्य खाल्ले. तिने सप्टेंबर २०१७ मध्ये मुलाला जन्म दिला होता. तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले तेव्हा ती ८ आठवड्यांची गर्भवती होती. ती ८ महिने खेळली नाही.

मेरी कोम : चार आठवड्यांत वजन सामान्य केले

३६ वर्षांची भारतीय मुष्टियोद्धा मेरी कोम ३ मुलांची आई आहे. २००७ मध्ये जुळी मुले झाली. २०१३ मध्ये मेरी पुन्हा एका मुलाची आई झाली. मे २०१३ मध्ये प्रसूतीनंतर वजन ७५ किलो झाले होते. मात्र, तिने व्यायाम, दोरी उड्या आणि डाएट कंट्रोलने चार आठवड्यांत वजन सामान्य केले.
सानियाने नुकतेच हे छायाचित्र सोशल मीडियात पोस्ट केले आहे.