Home | Business | Business Special | Sanitary cup instead of sanitary napkins for women

महिलासांठी आता सॅनिटरी नॅपकिन ऐवजी 'सॅनिटरी कप', फक्त 300 रूपयांत 8 वर्षांसाठी नो टेंशन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 03:25 PM IST

भारतात दरवर्षी 43.2 कोटी सॅनिटरी नॅपकिनचा वापर, 'सॅनिटरी कप' मध्ये व्यवसायिक संधी

 • Sanitary cup instead of sanitary napkins for women


  नवी दिल्ली - महिलांसाठी मोठ्या परिवर्तनाची तयारी सुरू आहे. आता बाजारात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन ऐवजी सॅनिटरी कप उपलब्ध होणार आहेत. एका माहितीनुसार नॅपकिनमुळे कचऱ्याचे प्रमाण खूप वाढले असून पर्यावरणासाठी खूप घातक आहे. 'दि क्लीन इंडिया जनरल' रिपोर्टनुसार भारतात वर्षाकाठी 43.4 कोटी सॅनिटरीचा वापर होत आहे. यापासून दरवर्षी तब्बल 9000 टन कचरा तयार होतो.

  नॅपकिन नष्ट होण्यासाठी 500-800 वर्षाचा कालवधी
  जनरलच्या माहितीनुसार या नॅपकिनमध्ये प्लास्टिक असते. त्यामुळे याला नष्ट होण्यासाठी 500-800 वर्ष लागतात. क्लीन इंडियाच्या माहितीनुसार नॅपकिन पर्यावरणासोबतच आरोग्यालाही घातक आहे. सध्यातरी बाजारात बायोडॅग्रॅडेबल नॅपकिन उपलब्ध आहेत. या नॅपकिनच्या पुढच्या रूपात सॅनेटरी कपचा वापर सुरू झाला आहे. या सॅनिटरी कपची किंमत 300-1000 रुपये आहे. हा सॅनिटरी कप आठ ते दहा वर्षापर्यंत काम करतो.


  आरामदायक आहे हा कप
  इंग्रजी वृत्तपत्र बिजनेस स्टॅंडर्डच्या वृत्तानुसार या कपाची ऑनलाईन मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मेट्रो सिटीपेक्षा छोट्या शहरातून याची अधिक मागणी होत आहे. यामध्ये होशियारपूर, जमशेदपूर, पटना, कोटा अशा शहरांचा समावेश आहे.


  तज्ज्ञांकडून सांगण्यात आले की, सुरूवातीला या कपाच्या वापरामुळे कौमार्य धोक्यात येण्याची शंका होती. तज्ज्ञाकडुन सांगण्यात आले की, हा कप खुप आरामदायक असून महिलांना याचा काहीही त्रास होणार नाही. महिला पिरियड दरम्यान या सॅनिटरी कपाचा वापर करतात आणि पाळी संपल्यानंतर कपाला साफ करून ठेवतात. पुन्हा पाळी आल्यानंतर नॅपकिन ऐवजी या कपाचा वापर करतात. हा सॅनिटरी कप 8 ते 10 वर्षापर्यंत टिकतो.


  भारतात 35 कोटी महिला आहेत या व्यवसायाचा भाग
  रिसर्च फर्म अलाइड मार्केट रिसर्चनुसार 2022 पर्यंत महिलांच्या महावारी संबंधी असलेल्या व्यवसायाचा आकार 42.7 अब्ज डॉलर कमी होईल. एकट्या भारतात 35 कोटी महिला या व्यवसायाचा भाग आहेत. रिपोर्टमध्ये हे सुध्दा सांगितले आहे की, मेट्रोसारख्या शहरामध्ये राहणाऱ्या मुली किंवा महिलांना या कपाचा वापर कसा करावा या बाबत माहिती नाही. डब्ल्युएचओच्या रिपोर्टनुसार प्लास्टिकपासून तयार केलेले नॅपकिन आरोग्यासाठी खूप घातक असतात. यामुळे कँसर होण्याची शक्यता असते.

  केळीच्या पानापासून सहज मातीत मिसळणारे पॅडची निर्मिती सुरू केली आहे
  स्वच्छता अभियानानंतर महिलांच्या स्वच्छते विषयी मोकळेपणाने बोलले जात आहे आणि महिलांना स्वस्त पॅड उपलब्ध करण्यासाठी मोहिम राबवली जात आहे. या मुद्द्यावर पॅडमॅन हा हिंदी चित्रपटसुध्दा आला आहे. काही दिवसांतच केळीच्या पानापासून सहज नष्ट होणाऱ्या पॅडची निर्मिती सुरू झाली आहे. अनेक खासगी संघटना या कामात आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, येणाऱ्या काळात महिलांची स्वच्छता एक मोठा मुद्दा किंवा मोठा व्यवसाय म्हणून उदयास येईल, कारण आताच्या महिला जागरूक आहेत.

Trending