Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | sanity worker died during work in solapur

सफाई काम करताना चक्कर येऊन झाला मृत्यू, मनपाकडून तत्काळ एक लाख रुपयांची मदत जाहीर

प्रतिनिधी | Update - Aug 26, 2018, 12:09 PM IST

शनिवारी सकाळी रंगभवन परिसरात झाडू मारताना महापालिकेचे कर्मचारी यशवंत सवाईसर्जेे यांचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला.

  • sanity worker died during work in solapur
    सोलापूर - शनिवारी सकाळी रंगभवन परिसरात झाडू मारताना महापालिकेचे कर्मचारी यशवंत सवाईसर्जेे यांचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. नुकसान भरपाई कायद्यांतर्गत नुकसान भरपाई द्या अन्यथा महापालिकेत मृतदेह आणू, असा पवित्रा उपस्थित कर्मचाऱ्यांनी घेतला. उपस्थित कामगार नेत्यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला. आजच्या अाज एक लाख देऊ आणि नंतर कायद्यानुसार सर्व नुकसान भरपाई देण्यात येईल, असे अाश्वासन मिळाल्यानंतर वातावरण निवळले.

    सकाळी साडेसातच्या सुमारास यशवंत ठाणप्पा सवाईसर्जे (वय ५५, न्यू बुधवार पेठ) यांनी नेहमीप्रमाणे झोन क्रमांक ८ येथे पंचिंग केले आणि प्रभाग क्रमांक ३३ मधील रंगभवन परिसरात झाडू मारू लागले. यावेळी चक्कर आली अन् ते खाली कोसळले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.


    कामगार नेते अशोक जानराव, आनंद चंदनशिवे, बबलू गायकवाड, तेजस्विता कासार, कांतू उघडे आदींची उपस्थिती होती. मनपा कर्मचाऱ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करून त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. मात्र आजपर्यंत कधीच तपासणी करण्यात आली नाही. इथून पुढे तरी सफाई वेळोवळी त्यांच्या आरोग्याची तपासणी होणे आवश्यक आहे, अशी मागणी कामगार नेत्यांनी केली.

Trending