Cricket / सहाय्यक प्रशिक्षक पदावरून संजय बांगर यांची हकालपट्टी? चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवायचे, ही अडचणी दुर करू शकले नाही 

फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरचा करार वाढवण्यावर साशंका 

दिव्य मराठी नेटवर्क

Jul 12,2019 06:51:00 PM IST

बर्मिगहँम - टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रीसह प्रशिक्षणातील सहकाऱ्यांचा कार्यकाळ ४५ दिवसांसाठी वाढवला जावू शकतो. मात्र, टीमचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचे करार वाढवण्याची शक्यता नाही. सुत्रांनूसार, बांगर आपली जबाबदारी योग्य रित्या सांभाळू शकले नाहीत. ते संघातील मुख्य (नंबर-४ चा फलंदाज) अडचण दुरू करू शकले नाही. बांगर संघाचे सहाय्यक प्रशिक्षक देखील आहे.


बांगर यांना विजय शंकर यांच्या दुखापतीची पूर्ण माहिती नव्हती. ते शंकर दुखापतीमुळे स्पर्धेत बाहेर होई पर्यत, त्यांची दुखापत गंभीर नसल्याचे सांगत होते. सुत्रांनुसार टीमचे फलंदाज त्यांच्याकडून अधिक सल्ले घेत नव्हते. जर एखाद्या फलंदाजाला काही अडचण आल्यास तो माजी फलंदाजाशी चर्चा करत होता.


बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांच्याशी चर्चा करणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्या व्यवहारामुळे निराश आहे. ते आपल्या मित्रांना तिकिट मिळवून देण्यासाठी आणि आपली खुर्ची संभाळण्यासाठी प्राथमिकता देतात. आमचे खेळाडूंना संपूर्ण समर्थन आहे, त्यांनी केवळ एकाच सामन्यात खराब खेळले. मात्र, टीम स्टाफच्या भूमिकेवर लवकरच निर्णय घेतला जाईल.

X
COMMENT