आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच सुरू होणार संजय दत्त-आयुष शर्माची गँगस्टर ड्रामा मूव्ही, महत्वाच्या भूमिकेत असेल बॉबी देओल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क- संजय दत्त आणि आयुष शर्मा लवकरच एका गँगस्टर चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या चित्रपाटाची घोषणा आधीच झाली होती, आता यावर काम सुरू करण्यात आले आहे. अहमद खान या चित्रपाटच्या प्रोडक्शनचे काम पाहत आहे. सध्या तो प्रोड्यूसर्सच्या शोधात आहे, प्रोड्यूसर मिळाल्यावर लगेच चित्रपाटाची शुटींग सुरू होईल.

 

सध्या टीम या चित्रपटाच्या गोष्टीवर काम करत आहे. हा एका रिअल लाइफ गँगस्टरवर आधारीत चित्रपट आहे. यासाठी इतर अभिनेत्यांची कास्टिंग सुरू आहे. यात संजय दत्त एका मुख्य भूमिकेत दिसेल, तर आयुष गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्याशिवाय यात बॉबी देओल पण एका महत्वाच्या भूमिकेत असेल. अभिनेत्रीसाठी जॅकलिन फर्नांडिसला विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...