आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजयने साइन केला 'पंडित गली का अली', 'पती पत्नी और वो'मध्येही दिसणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आपल्या प्रोड्क्शन हाउसचा पहिला चित्रपट 'प्रस्थानम'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या संजय दत्तने आपला पुढील चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटाचे नाव 'पंडित गली का अली' असे आहे आणि याचे दिग्दर्शन २००९ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह करतील. या चित्रपटामध्ये संजयसोबत ऋषी कपूरदेखील महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. तथापि, अद्यापपर्यंत या चित्रपटाबाबत अधिक माहिती हाती आलेली नाही, परंतु लवकरच निर्माते यासंदर्भात घोषणा करतील.

'पती पत्नी और वो'मध्येही दिसणार
एवढेच नाही तर संजय दत्तने हबीब फैजलचा आगामी चित्रपट 'पती, पत्नी और वो'देखील साइन केला आहे. कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे अभिनीत या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करणार आहेत.

निर्मितीचे काम सांभाळणार मान्यता
संजयची पत्नी मान्यता सध्या निर्मिती क्षेत्रात सक्रिय आहे. तिने आपले बॅनर दत्त प्रोड्क्शन्ची संपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे. आता ऐकण्यात आले आहे की, पहिला चित्रपट 'प्रस्थानम'नंतर हे बॅनर आता एका विनोदी चित्रपटाची निर्मितीदेखील करणार आहे. त्याचे नाव 'व्हर्जिन ट्री' असेल. यामध्ये संजय व्हर्जिन बाबाचे पात्र साकारणार आहे. याचे दिग्दर्शन जाहिरातपटाचे निर्माते सिद्धांत करतील. याशिवाय मान्यता एका विनोदी पंजाबी चित्रपटाचीही निर्मिती करणार आहे. त्याची शूटिंग पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये सुरू होईल.