आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Says 'i Will Make A Movie On My Father's Life, His Journey Has Been Fantastic'

संजय दत्त म्हणाला - 'वडिलांच्या आयुष्यावर बनवणार चित्रपट, त्यांचा प्रवास खूप शानदार राहिला आहे'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आगामी चित्रपट 'प्रस्थानम' चे टायटल ट्रॅक लॉन्चिंगसाठी जयपुरला आलेल्या संजय दत्तने कुटुंब, पेरेंट्स आणि बॉलिवूड फ्रेंड्सबद्दल सांगितले, तो म्हणाला, 'वडिलांच्या आयुष्यावर चित्रपटात बनवण्याचा विचार कधीपासून करतो आहे. ज्यावर काम सुरु करणार आहे. त्यांची जर्नी खूप शानदार आहे, जी पडद्यावर आणणे गरजेचे आहे.'
 
तो म्हणाला, 'माझे आई वडील माझे देव आहेत आणि त्यांच्या वरती मला जायचे नाही. ते कलाकार नाहीयेत माझे हीरो आहेत. कितीही मोठा किंवा हिट चित्रपट बनवला तरी त्यांच्यापेक्षा खालीच राहीन. मनीषा कोयराला आणि जॅकी श्राॅफबद्दल बोलायचे तर ते दोघे लिजंड आणि फायटर आहेत. जॅकी तर माझा बीड़ू आहे.' तो मान्यता दत्त, अली फजल, अमायरा दस्तूर आणि सत्यजीत दूबेसोबत शुक्रवारी शहरात होता. 
 

मान्यतासोबत कारण चालत नाही... 
संजयला जेव्हा विचारले गेले की, कोणता रोल फिट आणि कम्फर्ट असतो, तेव्हा त्याने सांगितले की, तो अॅक्शनमध्ये फिट राहतो. अॅक्शन करणे जास्त कम्फर्ट असते. अॅक्शन विद एंटरटेनमेंटला कधीच मरण नाही. त्याने बायको मान्यतासोबत काम केल्याबद्दल म्हंटले, ती हार्ड वर्कर आहे. जेव्हा तिच्यासोबत काम करायचे असते तेव्हा कोणतेच कारण चालत नाही. मात्र तोदेखील वेळेच्या बाबतीत टाळाटाळ करत नाही. त्याची वेळ फिक्स आहे. सकाळी 10-11 ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंतच काम करू शकतो. 
 

मनीषा फायटर, राजकारण करण्याची मानसिकता नाही...  
आपल्या आणि मनीषाच्या अप्स अँड डाउन्सबद्दल तो म्हणाला, मनीषासोबत खूप काळानंतर काम करून मजा आली. आम्ही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. मनीषा एक रिअल फायटर आहे. ती आजदेखील खूप सुंदर आहे. राजकारणात कमबॅक करण्याच्या बातम्यांना त्याने अफवा असल्याचे सांगितले. म्हणाला, पॉलिटिक्समध्ये जाण्याची काहीही इच्छा नाही. 
 

कथा ऐकती, आवडली तर मनापासून काम करतो... 
संजय दत्त टीमसोबत जयपुर नॅशनल यूनिवर्सिटीच्या स्टुडंट्समध्ये पोहोचला आणि आपल्या चित्रपटातील डायलॉग बोलून स्टुडंट्सला उत्साहित केले. चांसलर संदीप बख्शीने वेलकम केले आणि कॅम्पसबद्दल माहिती दिली. स्टुडंट्सने दत्तच्या हिट चित्रपटाच्या थीमवर 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'खलनायक', 'पुलिसगिरी' आणि 'वास्तव' चित्रपटातील भूमिका मंचावर साकारल्या. संजय दत्त म्हणाला, प्रेक्षक चित्रपट पाहून खुश झाले, याने आनंद मिळतो. त्याने स्वतःला सुपरस्टार किंवा एखादा नंबर न देता म्हणाला, 'मी संजय दत्त आहे, कोणताही नंबर नाही. अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. केवळ अबिनेट आहे, गोष्ट ऐकतो. जी आवडते ते काम मनापासून करतो.' 
 

झालो आहे 60 वर्षांचा बाबा... 
बाबा की संजू, कोणते नाव जास्त आवडते ? यावर तो म्हणाला, लहानपणी वडिलांसोबत सेटवर जायचो तेव्हा सर्व म्हणायचे बाबा आला. तेव्हापासून हे नाव पडले होते आणि आता 60 वर्षांचा झालो आहे तेव्हाही लोक प्रेमाने बाबाच म्हणतात. संजयसोबत आलेल्या अली फजलने सांगितले, पुन्हा गुड्डू भैय्याच्या रूपात दिसणार आहे, पण यावेळी भूमिका थोडी वेगळी असेल. यासाठी तयारी सुरु आहे. सत्यजित म्हणाला, संजू सर म्हणाले होते की, अॅक्टिंगला अॅक्टिंगसारखेच करायचे. जास्त त्यामध्ये शिरण्याची गरज नाही. अमायरा म्हणाली, जेव्हा एवढी मोठी संधी मिळते तेव्हा आपोआपच चांगला एक्स्पीरियंस येतोच. 

बातम्या आणखी आहेत...