आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Statement On Joining Rashtriya Samaj Paksha In Maharashtra Assembly Election

संजय दत्तने पक्ष प्रवेशावर दिले स्पष्टीकरण, म्हणाला- 'मी कोणत्याच पक्षात प्रवेश करत नाहीये'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महादेव जानकरांनी रविवार झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले होते की, संजय दत्त त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार आहे. संजय दत्तने त्याच्या या पक्ष प्रवेशावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सांगितले की, तो कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाहीये. 

संजय म्हणाला, 'रासप प्रमुख महादेव जानकर माझे मित्र आणि भावासारखे आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो.' रासप महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपसोबत आहे. पशुसंवर्धन आणि डेअरी विकास मंत्री महादेव जानकर यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी सिनेमा जगतात काम करणे सुरू केले आहे. तसेच येत्या 25 सप्टेंबरला संजय दत्त आपल्या पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

संजयने सपामध्ये प्रवेश घेतला होता
संजय 2009 मध्ये समाजवादी पार्टी (सपा) च्या तिकीटावर लखनऊ लोकसभा निवडणुकीत उतरला होता, पण न्यायालयाने शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला झालेल्या शिक्षेला कमी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याने निवडणुकीतून माघार घेतली होती. संजय सपाचा महासचिवदेखील राहिला आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्याने आपली बहिण आणि काँग्रेस उमेद्वार प्रिया दत्तसाठी मुंबईत प्रचारही केला होता.