आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगरला 'खलनायक' बनवून पडद्यावर आणू इच्छित आहे संजय दत्त 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : संजय दत्त सध्या व्यग्र कलाकारांपैकी एक आहे. याव्यतिरिक्त ताे निर्मितीतही उतरला आहे. निर्माता म्हणून ताे खूप सक्रिय असताे. सध्या तो 'खलनायक'चा रिमेक बनवण्याचा विचार करत आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी संजय टायगर श्राॅफला घेण्याच्या विचारात आहे. या चित्रपटाचे हक्क संजयने सुभाष घई यांच्याकडून घेतल्याचे टायगरच्या बोलण्यावरून नुकतेच कळले. संजयबरोबर याविषयीची त्यांची पहिली बैठक झाली आहे. याच्या पुढची माहिती टायगरने दिली नाही. शिवाय हा चित्रपट करायचा की नाही यावर टायगर अजून ठाम नाही. यासाठी त्याने संजयकडून वेळ मागितला आहे.

टायगर याविषयी म्हणाला..
'संजू सर एक नम्र व्यक्ती आहेत. त्यांच्याशी मी बोललो. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मला त्यांच्याबरोबर नक्कीच काम करायला आवडेल, परंतु अद्याप काहीच ठरले नाही. खरं तर, चाहत्यांच्या आवडीनिवडी जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. मी आज जे काही आहे ते माझ्या चाहत्यांच्यामुळेच आहे.

'छोटे चाहते' होतील नाराज
टायगरच्या जवळच्या लोकांच्या मते, टागयर सध्या प्रकाशझोतात आहे. त्यामुळे तो नकारात्मक भूमिका करण्याची रिस्क घेणार नाही. खलनायक न करण्यामागे आणखी एक मोठे कारण आहे, ते म्हणजे टागयर श्रॉफची लहान मुले मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. ही भूमिका त्याने केली तर मुले नाराज होतील.

रॅम्बोचा भारतीय रिमेक चाहत्यांना प्रभावित करेल
रॅम्बोचा भारतीय रिमेक प्रेक्षकांना नक्कीच प्रभावित करेल, याची मला खात्री आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, इतर माध्यम आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट लोकांना आवडतात. आपणही आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांसारखेच चित्रपट बनवतो. व्हीएफएक्स आणि विशेष प्रभावांच्या बाबतीत ते आपल्यापेक्षा पुढे आहोत. रिमिक्स आव्हानात्मक आहेच. तरीही, ते पात्र आणि कथेत बदल करून त्या फ्लेेव्हरचा चित्रपट आपण बनवू शकतो. ही आमची जबाबदारी आहे.

इतर चित्रपटात देणार टायगरला संधी
'खलनायक'च्या रिमेकसाठी संजय टायगरला घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र नकारात्मक भूमिकेमुळे तो यासाठी तयार झाला नाही तर संजयकडे यासाठी बॅकअप प्लान आहे. त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, संजयकडे सकारात्मक भूमिका असलेले काही चित्रपट आहेत. त्यात तो टायगरला घेऊ शकतो.