आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt's Daughter Trishala's Boyfriend Died, Nobody Is Even Don't Knows That Person's Name

संजय दत्तची मुलगी त्रिशालाच्या बॉयफ्रेंडचा झाला अचानक मृत्यू, मात्र कुणाला त्या व्यक्तीचे नावही माहित नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तने इन्स्टाग्रामवर आपल्या बॉयफ्रेंडचा अचानक मृत्यू झाल्याने एक पोस्ट लिहिली आहे. इटॅलियन असलेल्या तिच्या या बॉयफ्रेंडविषयी जास्त माहिती तर मिळाली नाही पण पण बातमी आहे की, त्याचे निधन 3 जुलैला झाले. बॉयफ्रेंडच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्रिशाला दुखत बुडाली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या बॉयफ्रेंडला श्रद्धांजली दिली आहे. 

 

त्रिशालाने असे व्यक्त केले दुःख... 
त्रिशालाने लिहिले, 'माझे हृदय तुटले, माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझी सुरक्षा करण्यासाठी आणि माझी केयर करण्यासाठी तुझे आभार. तू मला आयुष्यात एवढे खुश ठेवले आहेस जेवढी मी कधीच नव्हते. तुला भेटून मी जगातील सर्वात नशीबवान मुलगी बनून धन्य झाले आहे. तू नेहमी माझ्या आत जिवंत राहशील. मी तुझ्यावर प्रेम करते आणि नेहमी तुला मिस कारेन जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही. नेहमीसाठी तुझी, तुझीच...' 

 

संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे त्रिशाला... 
त्रिशाला संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. तिने न्यूयॉर्कच्या जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनलमधून लॉमध्ये ग्रॅजुएशन केले आहे. यानंतर तिने न्यूयॉर्कच्या हॉफ्स्ट्रा यूनिवर्सिटीमधून मास्टर्सची डिग्रीदेखील घेतली आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावत आहे. तिने 2014 मध्ये आपले 'ड्रीम ड्रेसेस एक्सटेंशन' लाइन सुरु केली. त्रिशाला तेव्हा केवळ 8 वर्षांची होती जेव्हा 1996 मध्ये तिची आई ऋचाची डेथ ब्रेन ट्यूमरने झाली. आईच्या निधनानंतर त्रिशालाला मावशीसोबत राहायची. आता ती 31 वर्षांची झाली आहे.