प्रस्थानम / राजकारणाची उत्तम कथा असूनही खूप चांगला प्रभाव पडू शकला नाही संजय दत्तचा चित्रपट 'प्रस्थानम'

चित्रपटाची कथा कौटुंबिक नाती आणि राजकारण याबद्दल आहे

दिव्य मराठी वेब

Sep 21,2019 10:09:00 AM IST

रेटिंग - 1.5/5

स्टारकास्ट - संजय दत्त, अली फजल, चंकी पांडे, मनीषा कोईराल, जॅकी श्रॉफ

दिग्दर्शक - देवा कट्‌टा

निर्माता - मान्यता दत्त

म्यूझिक - अंकित तिवारी

जॉनर - पॉलिटिकल अॅक्शन ड्रामा

कालावधी - 141 मिनिटे

बॉलिवूड डेस्क : 'प्रस्थानम' एका साउथ इंडियन चित्रपटाचा रीमेक आहे. हा सुमारे नऊ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यानंतर संजयने हा चित्रपट हिंदीमध्ये बनवण्यासाठी याचे राइट्स विकत घेतले होते. हा रीमेक मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक देव कट्टा यांनीच दिग्दर्शित केला आहे. संजय या चित्रपटाची निर्मिती करण्याबरोबरच यामध्ये मुख्य भूमिका म्हणजेच बलदेव सिंहची भूमिका साकारत आहे.


अशी आहे चित्रपटाची कथा...
ही कथा कौटुंबिक नाती आणि राजकारण यांबद्दल आहे. बलदेव आपल्या पार्टीतील वयस्क नेत्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर पार्टीची धुरा सांभाळतो आणि त्याच नेत्याच्या सांगण्यावरून त्यांची सून सरोज (मनीषा कोईराला) सोबत लग्न करून मुलगी पलक (चाहत खन्ना) आणि मुलगा आयुष (अली फजल) चा स्वीकार करतो. पण 25 वर्षानंतर बलदेव आणि सरोज यांचा मुलगा विवान (सत्यजीत दुबे) आणि मुलगी पलक खुश नाहीये. मुलीला वाटते की, आईने दुसरे लग्न करून चूक केली आहे. तसेच मोठ्या मुलाला वाटते की, पिता मोठ्या मुलाला त्याच्यापेक्षा जास्त योग्य समजून त्याला गादीवर बसवून आपल्यावर अन्याय करत आहेत. या सर्वांमध्ये विवान बदला आणि सत्तेच्या लालसेमध्ये काही अशी कामे करतो, ज्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतील. यासोबतच अनेक रहस्यदेखील समोर येतात.


चित्रपटाची कथा चांगली आहे आणि जर याला चांगल्या पद्धतीने हाताळले गेले असते तर आणखी जास्त चांगला प्रभाव पडला असता. जॅकी श्रॉफ, अली फजल, मनीषा, संजय आणि सत्यजीत यांनी काही भावुक सीन्स खूपच उत्तम केले आहेत, पण अनेक सीन्समध्ये कठ्ठा कोणत्या काळात सुरु साली आणि मग कोणत्या काळात गेली याचा उलगडा योग्यप्रकारे होत नाही.


फरहाद सामजीचे डायलॉग्सदेखील तितकेसे प्रभावी वाटले नाहीत. चित्रपटाचा कालावधी काही गाणी आणि भूमिकांमध्ये वाया जातो. जर तो काही वेळ भूमिकांची पार्श्वभूमी सांगण्यात गेला असता तर आणखी चांगला प्रभाव पडला असता. अनेक ठिकाणी व्हीएफएक्सचा प्रयोग झाला जो कथेनुसार योग्य वाटलं नाही. संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांना तरुण दाखवण्यासाठी केलेला मेकअप प्रभावी वाटत नाही. कथेमध्ये काही उणीव नक्की आहेत. काही भूमिका जसे की, चंकी पांडे आणि जाकिर हुसैन यांना काही जास्त करण्याची संधी मिळाली नाही. मात्र असे असतानाही चित्रपट एकदा पाहू शकतो.

X
COMMENT