आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Dutts Sister Priya Dutt Does Not Want To Contest Lok Sabha Election 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय दत्तची बहीण या कारणामुळे लढविणार नाही लोकसभा निवडणूक, राहुल गांधी यांना पाठविला Email

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची बहीण आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात प्रिया दत्त यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांन ईमेल पाठवून लोकसभा निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे.

 

मीडिया रिपोरर्ट्‍सनुसार, प्रिया दत्त यांनी मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. प्रिया दत्त‍ यांनी दिलेल्या आपल्या निर्णयानंतर या मतदार संघासाठी काँग्रेसने नव्या उमदेवारासाठी चाचपणी सुरु केली आहे. या जागेसाठी सिनेतारकाला उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस विचाराधीन आहे. याबाबत काँग्रेसने हलचाली सुरु केल्या आहेत.

 

प्रिया दत्त या कारणासाठी लढविणार नाही लोकसभा निवडणूक
दोनदा खासदार राहिलेल्या प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक न लढविण्यामागे प्रिया दत्त यांनी वैयक्तिक कारण पुढे केले आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे प्रिया दत्त यांनी हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत आघाडी केली आहे. दोन्ही पक्षात जागा वाटपावरून सहमती झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. दोन्ही पक्ष आपापले 20 उमेदवार मैदानात उतरविणार आहेत. उर्वरित आठ जागा इतर मित्र पक्षासाठी सोडण्यात येणा आहे.