Home | Bollywood | Marathi Cinekatta | sanjay jadhav's new film 'luckee' releasing soon

लवकरच तुमच्या भेटीला येत आहे नवीन मराठी चित्रपट 'लकी', बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे मराठी सिनेसृष्टीत पहिले पाऊल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 30, 2018, 12:16 AM IST

संजय जाधव निर्मित 'लकी' 7 फेब्रुवारी 2019 ला होत आहे रिलीज..

  • sanjay jadhav's new film 'luckee' releasing soon

    एंटरटेन्मेंट डेस्क : फिल्ममेकर संजय जाधवने गुरूवारी सोशल मीडियावरून आपल्या 'लकी' या नव्या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे. 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला 'लकी' सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

    'एम एस धोनी' आणि 'फ्लाइंग जट' यांसारख्या हिट सिनेमांची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग 'लकी' सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. यासंदर्भात बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक आणि लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणाले, “आमच्या निर्मितीसंस्थेला मराठी चित्रपटनिर्मितीत उतरण्याची ब-याच काळापासून इच्छा होती. संजय जाधव हे मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे फिल्ममेकर आहेत. त्यांच्यासोबत आम्ही पहिला सिनेमा केल्याचा आम्हाला आनंद आहे. आता लवकरच 7 फेब्रुवारीला आमचा हा सिनेमा रिलीज होईल.”

    'दुनियादारी', 'तू हि रे', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'गुरू', 'येरेयेरे पैसा' अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या संजय जाधव यांच्या 'लकी' सिनेमातून साऊथ सिनेमा गाजवलेली अभिनेत्री दिप्ती सती डेब्यू करत आहे. अभय महाजन आणि दिप्ती सती सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसतील.

    फिल्ममेकर संजय जाधव म्हणाला, “ व्हॅलेंटाईन्सच्या महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. तुमच्या संपूर्ण कुटूंबासोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकाल आणि तुमचे दोन तास भरपूर मनोरंजन होईल, याची मला शाश्वती आहे.”

Trending