आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय कपूर बर्थडे : अनिल कपूरच्या भावाने NRI मुलीसोबत थाटला संसार, पत्नी महीप बिझनेसमधून कमावते कोट्यवधी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अनिल कपूरचा धाकटा भाऊ संजय कपूर वयाची 53 वर्षे पूर्ण करणार आहे. 17 ऑक्टोबर 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या संजयचे लग्न मॉडेल राहिलेल्या महीप संधूसोबत जाले आहे. मुळची पंजाबी असलेली महीप NRI असून तिने तिचा दीर्घ काळ ऑस्ट्रेलियात घालवला आहे. महीपने 1994 मध्ये आलेल्या इला अरुणच्या 'निगोडी कैसी जवानी है' या म्युझिक व्हिडिओत काम केले होते. पण त्यानंतर तिला अभिनय क्षेत्रात यश मिळाले नाही. 2002 मध्ये तिने संजय कपूरसोबत लग्न केले. महीप आता ज्वेलरी डिझाइनच्या बिझनेसमधून कोट्यवधी रुपये कमावते. तर संजय काही दिवसांपूर्वी 'दिल संभल जा जरा' या टीव्ही शोमध्ये झळकला होता. फेब्रुवारी 2018 मध्ये ही टीव्ही मालिका बंद झाली.

 

मुंबईत ज्वेलरी डिझाइन स्टोअर चालवते महीप...
महीपचे मुंबईत 'बांद्रा 190' नावाचे रिटेल बुटीक आहे. सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान या स्टोअरमध्ये तिच्या पार्टनर आहेत. या स्टोअरमध्ये होम डेकोर, ज्वेलरी आणि क्लोदिंग ऑप्शन्स आहेत. 


फॅशन डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएट आहे महीप...
महीपने ऑस्ट्रेलियातून फॅशन डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. त्यानंतर मुंबईतील एका डायमंड इन्स्टिट्युटमध्ये काही वर्षे ट्रेनिंग घेतले. येथे ती ज्वेलरी स्केचिंग, डिझायनिंगशिवाय महागडे स्टोन्स आणि जेम्सचे काम शिकली.

 

शाहरुखच्या पत्नीपासून ते फराहपर्यंत आहेत महीपच्या क्लायंट...

शाहरुखची पत्नी गौरी खान, कोरिओग्राफर फराह खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे, कतरिना कैफ, मलायका अरोरा, दीया मिर्जा, मान्यता दत्त, कृती सेनन, उर्मिला या महीपच्या क्लायंट आहेत. महीपने अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्ससाठी ज्वेलरी डिझाइन केली आहे. 'ओम शांति ओम'मध्ये दीपिका पदुकोण, 'कभी अलविदा ना कहना'मध्ये राणी मुखर्जी आणि 'उमराव जान'मध्ये ऐश्वर्या रायसाठी तिने ज्वेलरी डिझाइन केली होती.

 

सलमानच्या बहिणीच्या लग्नाची ज्वेलरी केली होती डिझाइन...
महीप कपूरने सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या लग्नाची ज्वेलरी डिझाइन केली होती. याशिवाय खान कुटुंबातील अनेक महिलांसाठीही तिने ज्वेलरी डिझाइनचे काम केले आहे. अर्पिताचे 2014 मध्ये आयुष शर्मासोबत लग्न झाले होते. 

 

महीपच्या सौंदर्यावर घायाळ झाला होता संजय...
एका मुलाखतीत संजय कपूरने सांगितले होते की, त्याची आणि महीपची पहिली भेट दिल्लीत झाली होती. महीपला बघताच तिच्या सौंदर्य आणि कॉन्फिडन्सवर तो फिदा झाला होता. काही दिवसांनी दोघांनी लग्न केले. संजयला शनाया (16 वर्षे) ही मुलगी आणि जहान (13 वर्षे) हा एक मुलगा आहे. 

बातम्या आणखी आहेत...