आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Kapoor Gets British Parliament Award For His Performance, But People Are Trolling Him On Twitter

संजय कपूरला अभिनयासाठी ब्रिटनच्या संसदेत मिळाला अवॉर्ड, मात्र यामुळे लोक त्याला ट्विटरवर जबरदस्त ट्रोल करत आहेत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता संजय कपूरला ब्रिटनच्या संसदेमध्ये 'सर्वात प्रेरणादायक भारतीय बॉलिवूड अभिनेता' हा अवॉर्ड मिळाला आहे. संजय कपूर मागच्या 30 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीसोबत जोडलेला आहे. तो यापूर्वी ‘जोया फैक्टर' या चित्रपटात दिसला होता. अवॉर्ड मिळाल्यानंतर तो म्हणाला, ''प्रत्येक कलाकाराला छान वाटते जेव्हा त्याला अवॉर्ड मिळतो. जेव्हा तुम्हाला 25 वर्षांनंतरही अवॉर्ड मिळाला तर लोक तुम्हाला आजही पसंत करतात आणि आणि कामाचे कौतुक करतात. मी ‘दिल संभल जा जरा' यांसारख्या टीव्ही सिरियलमध्ये काम केले. मला वाटते की, 30 मिनिटांची शॉर्ट फिल्मदेखील तुमचे करिअर बनवू शकते.''

53 वर्षीय अभिनेता पुढे म्हणाला 'मला आज अधिक सुरक्षित वाटत आहे. एका अभिनेत्याच्या रूपात मला अधिक विविधता असलेल्या भूमिका मिळत आहेत. मी या संधीसाठी आभारी आहे. मग त्या चित्रपटात असो किंवा वेब सीरीज मध्ये.'' मात्र त्याला हा अवॉर्ड मिळाल्यानंतर ट्विटरवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. कुणाला खरेच वाटत नाहीये की, संजय कपूरला ब्रिटनच्या संसदेने एवढा मोठा अवॉर्ड दिला आहे. लोकांनी त्याला अनेक मीम्स आणि जोक्स बनवून ट्रोल केले. 

बातम्या आणखी आहेत...