आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Kapoor's Daughter Assistant Director In Janhvi Kapoor's Upcoming Movie Kargil Girl

जान्हवी कपूरच्या अपकमिंग फिल्ममध्ये असिस्टंट डायरेक्टर बनली संजय कपूरची मुलगी शनाया, लखनऊत सुरू आहे चित्रपटाचे शूटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलीवूड डेस्क - संजय कपूरने आपल्या 19 वर्षीय मुलीचे बॉलीवूडमध्ये स्वागत केले आहे. त्यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत लिहिले की, 'माझी मेहनती मुलगी 41 डिग्री तापमानात असिस्टंट डायरेक्टरचे काम करत आहे. तिचे या चित्रपट सृष्टीत स्वागत आहे.' शनाया असे संजय कपूरच्या मुलीचे नाव आहे. शनायाने उन्हापासून वाचण्यासाठी आपला चेहरा स्कार्फने झाकला आहे. ती भारतीय वायुदलातील पहिली महिला पायलट गुंजन सक्सेनाचा बायोपिक शूट करत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
 

 
फेब्रुवारीतच केली होती घोषणा
> संजय कपूरने यावर्षी फेब्रुवारीत शनाया बॉलीवूडमध्ये प्रवेश करत असल्याचे घोषित केले होते. त्यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर लिहिले होते की, 'नवा प्रवास, या नवीन प्रवासासाठी शनायाला हार्दिक शुभेच्छा' तर शनायाची आई महीप सिंधूने लिहिले होते की, 'माझी मुलगी दोन आठवड्यांसाठी लखनऊला जात आहे. तिची खूप आठवण येत आहे.'


लखनऊमध्ये सुरू आहे चित्रपटाचे चित्रीकरण

> लखनऊमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. कॅप्टन मनोज कुमार पांडे यूपी सैनिकी शाळा आणि एअरफोर्ससह इतर ठिकाणांवर या चित्रपटाचे दृष्य चित्रीत करण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार 24 मे पर्यंत लखनऊचे शेड्यूल चालणार आहे. यानंतर चित्रपटाचा चमू बाहेर देशातील शेड्यूल पूर्ण करण्यासाठी अब्रॉडला जाणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी जान्हवीच्या वडिलांची भूमिका करणार आहे. शरण शर्मा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदापर्ण करत आहे.