आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Leela Bhansali's Niece Sharmin Was Of 94 Kg, Everyone Used To Laughe At Her When She Was On The Stage

एकेकाळी 94 किलोची होती संजय लीला भन्साळींची भाची शर्मिन, स्टेजवर तिला पाहून हसायचे लोक 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : संजय लीला भन्साळींची भाची शर्मिन सहगल अभिनेत्री म्हणून डेब्यू चित्रपट 'मलाल' रिलीज झाला आहे. पण एक वेळ शी होती, जेव्हा तिला डॉक्टर व्हायचे होते. ही माहिती तिने स्वतः एका बातचितीदरम्यान दिली होती. शर्मिन म्हणाली होती, "मला डॉक्टर व्हायचे होते. कॉलेजच्या काळात मी थिएटर केले, जिथून मला अभिनय आवडायला लागला. स्टेजवर मला पाहून सर्वजण हसायचे, कारण त्यावेळी माझे वजन 94 किलो होते. अभिनेत्री बनण्याचे स्वप्न भयानक होते, कारण ग्लॅमर वर्ल्डमध्ये प्रतिभेपेक्षा जात तुमचे असणे गरजेचे असते."

 

वजन कमी करायला लागले 6-7 वर्ष.. 
शर्मिनने दैनिक भास्करसोबत बातचितीमध्ये सांगितले की, तिचे वजन वाढायला वयाच्या 10 व्या वर्षापासूनच सुरुवात झाली होती. 17 वर्षांच्या वयात ती 94 किलोची झाली होती. मग तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि ती  6-7 वर्षात फिट होऊ वशकली. सध्या तिचे वजन 49 किलो आहे.  

 

शर्मिनने असे कमी केले वजन... 
शर्मिनने आपली वेट लॉस जर्नी शेअर करताना सांगितले, "मी माझे जेवण कमी केले आणि एक्‍सरसाइज जास्त केली. यासोबत भन्साळी सरांना असिस्ट करताना सेटवर रोज 15 तास जायचे. 'मेरीकॉम' च्या शूटिंगच्यावेळी सेटवर मी दिवसातील केवळ 15 मिनीटांसाठीच बसायचे. तेही केवळ लंच ब्रेकमध्ये. बाकी पूर्णवेळ उभे राहूनच काम करावे लागायचे. कॉस्‍ट्यूमपासून ते बाकीचे सर्व काम पूर्ण करेपर्यंत दिवसभर पळत राहायचे." शर्मिन 'रामलीला' आणि 'बाजीराव मस्तानी' हीदेखील असिस्टंट डायरेक्टर होती.  

 

'कीटो किंवा इंटरमिटेंट डाएटची प्रॉसेस नव्हती...'
शर्मिन पुढे म्हणाली, "इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की, जेव्हा वेट लॉस करत होते, तेव्हा कीटो किंवा इंटरमिटेंट डाएटची प्रोसेस नव्हती. कीटो तर आता दोन वर्षांपूर्वी आले आहे. माझी वेट लॉसची प्रॉसेस सहा-सात वर्षांपूर्वी सुरु झाली होती, जी मागच्यावर्षी संपली आहे. सुरुवातीचे काही महिने मी केवळ डाएट कंट्रोल करण्यात घालवले. यादरम्यान एक्‍सरसाइज नाही केली. नाहीतर गुढघे आणि पाठीवर त्याचा परिणाम झाला असता. 

 

जिम, फूड, माइंड डिस्‍क्र‍िप्‍शन सर्वांचा ताळमेळ घालून वेट कंट्रोल होत असते. या प्रॉसेसमध्ये एक वर्ष असेही होते, जेव्हा वजन एकाच पॉइंटवर येऊन थांबले आहे. ते ना कमी होत होते ना वाढत होते. तेव्हा मी आणखी जास्त मेहनत करायला सुरुवात केली."

 

4 जुलैला रिलीज झाला आहे चित्रपट 'मलाल'
मंगेश हदावलेच्या डायरेक्शनमध्ये बनलेला चित्रपट 'मलाल' 4 जुलैला रिलीज झाला आहे. शर्मिनसोबत जावेद जाफरीचा मुलगा मीजाननेदेखील या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. चित्रपटाचे प्रोडक्शन संजय लीला भन्साळींनी भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्यासोबत मिळून केले आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 45 लाख रुपयांची कमाई केली. 

बातम्या आणखी आहेत...