आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Losabha2019 ; कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिकांना 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी शिवसेनेच्या संजय मंडलिकांनी केले पराभूत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- चुरशीच्या अशा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळेसही कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती, तसेच शिवसेनेनेही परत एकदा संजय मंडलिकांना संधी दिली. याशिवाय बसपातर्फे दुनदप्पा कुंदप्पा श्रीकांत तर वंचित आघाडीतर्फे डॉ. अरुणा माळी मैदानात होत्या. 

 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची खास बाब म्हणजे एकेकाळी शिवसेनेचे उमेदवार असलेले धनंजय महाडिक 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा धनंजय महाडिकांवर विश्वास टाकून त्यांना मैदानात उतरवले आहे. परंतु त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.


असा होता 2014 चा निकाल
2014 मध्ये राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांनी 6,07,665 मते मिळाले होते, तर शिवसेनेच्या संजय मंडिलकांना 5,74,406 मते मिळाली होती. 

बातम्या आणखी आहेत...