आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हे नास्तिक आहेत, पण काँग्रेसमधील प्रत्येक जणच नास्तिक नाही', संजय निरुपम यांचा पक्षाला घरचा आहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फ्रान्सकडून भारताला मिळालेल्या बहुचर्चित राफेल लढाऊ विमानाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. राजनाथ सिंह यांनी फ्रन्समध्ये जाऊन राफेलची विधीवत पुजा केल्याने काँग्रेस सरकारवर टीका करत आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही पूजा म्हणजे तमाशा असल्याचे म्हटले. त्यावर काँग्रेस नेते संजुय निरुपम यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. संजय निरुपम म्हणाले की, "शस्त्र पूजा हा तमाशा नसतो, ती आपली जुनी परंपरा आहे." असे म्हणत निरुपम यांनी खर्गेंवर निशाना साधला. 
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेलची पूजा केली. यावेळी त्यांनी विमानावर ओम काढून आणि चाकाखाली लिंबू ठेवले. हे लिंबू ठेवलेल्या राफेलचा फोटो व्हायरल होताच, काहींनी यावर आश्चर्य व्यक्त केली तर, विरोधकांनी यावर टीकास्त्र सोडले. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "आम्ही बोफोर्ससारखी शस्त्र आणली तेव्हाही त्याची पूजा केली नव्हती. पॅरिसमध्ये जे सुरु होतं, तो एक तमाशा होता." त्यावर संजय निरुपम म्हणाले की, "शस्त्र पूजा हा तमाशा नसतो, ती आपली जुनी परंपरा आहे. हे नास्तिक आहेत, पण काँग्रेसमधील प्रत्येक जणच नास्तिक नाही." असे उत्तर संजय निरुपम यांनी दिले.पक्षावर नाराज आहेत निरुपम

संजय निरुपम काँग्रेसवर नाराज असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरुन दूर केलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी शिफारस केलेल्या एका उमेदवारालाही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे प्रचारातही सहभागी होणार नसल्याची भूमिका संजय निरुपम यांनी घेतली.

बातम्या आणखी आहेत...