आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेने कोट्यवधी रुपये लाटले - संजय निरुपम यांचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेने बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला असून सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी सोमवारी केली. 


देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेने बनावट कागदपत्राद्धारे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत दूध भुकटी प्रकल्पासाठी २४ कोटी ८१ लाख अनुदान मंजूर करून घेतले आहेत. त्यातील ५ कोटी या संस्थेला मिळाले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीत या प्रकल्पासाठी त्यांनी जमीन एनए ऑर्डर, प्रदूषण परवाना, बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व औषध प्रशासन परवाना, एमएसईबी परवाना पत्रक, दुग्ध प्रक्रिया, दुग्ध संकलन या सर्व विभागांची सर्व कागदपत्रे बनावट आहेत. लोकमंगल संस्थेचे दूध प्रक्रिया केंद्र करमाळा, सांगोला, मंगळवेढा, बीबीदारफळ येथील सद्य:स्थितीत बंद असल्याचे निदर्शनास आलेले आहे, असे निरुपम म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...