आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज आढळल्याचे समोर आले आहे. संजय राऊत हे आज दुपारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर सर्वांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आणि रुटीन चेकअप असल्याचे सांगितले होते. पण, लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. त्यात त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस असल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात येत आहे. लीलावती रुग्णालयात डॉ.मॅथ्यू हे संजय राऊतांची अँजिओप्लास्टी करत आहेत.
सध्या त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू आ. सुनील राऊत, कुटुंबातील सदस्य प्रवीण राऊत, सुजित पाटकर आहेत. चार दिवसांपूर्वी राऊत यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीखाली आहेत. ताण घेतल्याने प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती आहे. पुढचे 2 दिवस ते लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असतील.
संजय राऊत दोन दिवसांपूर्वीही रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आले होते. त्यावेळेस त्यांच्यावर ईसीजी चाचणीनंतर त्यांना पुढील चाचण्यांसाठी परत रुग्णालयात बोलवले होते, त्यासाठीच ते आज रुग्णालयात आले होते. त्यांना उद्यापर्यंत घरी सोडण्यात येईल, असे संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागले. तेव्हापासूनच रोज तीन-चार वेळा संजय राउत माध्यमांशी संवाद साधत होते. त्यानंतरही भाजपवर मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकणे असो वा आपल्या पक्षाची भूमिका मांडणे, सर्वच घटनाक्रमात शिवसेनेकडून संजय राउत सर्वात पुढे होते. त्यातही राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर भाजपने सत्ता स्थापनेत असमर्थ असल्याचे सांगितले, शिवसेनेवर टीका केली. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी 24 तासांची वेळ गेली, त्यावेळी सुद्धा संजय राउत यांनी प्रखरपणे आपली भूमिका मांडली. संजय राउत यांनी डॉक्टरांची आधीच अपॉइंटमेंट घेतली होती. अर्थात त्यांना आधीपासूनच छातीत दुखण्याचा त्रास होता असे कळते. परंतु, अगदी अपॉइंटमेंटच्या दिवशी (सोमवारी) सुद्धा त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यातच राउत यांना आता रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.