आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' फाईलमध्ये दडलय काय...? राज्यपालांच्या भेटीदरम्यान संजय राऊतांच्या फाईलची चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी आज महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान राऊत आणि कदम यांच्याकडे एक फाईल होती. भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या फाईलबद्दल विचारल्यावर राऊतांनी तात्काळ ती फाईल आपल्या सुरक्षा रक्षकाला गाडीत ठेवायला सांगितली. त्यामुळे आता त्या ती फाईल कशाची होती, त्या फाईलमध्ये काय आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे.पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, "आम्ही राज्यपालांशी प्रदिर्घ चर्चा केली. यात महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाली. मात्र, आमच्या दृष्टीने ही सदिच्छा भेट होती. उद्धव ठाकरेकडून आम्ही त्यांना भेटलो. राज्यपालांना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंचं "फटकारे" आणि उद्धव ठाकरे यांचे "पाहावा विठ्ठल" आणि "महाराष्ट्र माझा" हे गड किल्ल्यांबाबतचे पुस्तक भेट दिले. राज्यपालांनी ही पुस्तकं चाळली. त्यांनी ही पुस्तकं खूप आवडली. लवकर सरकार स्थापन व्हावी आणि त्यासाठी शिवसेना हा कुठेही अडथळा ठरत नाही. ही परिस्थिती आम्ही राज्यपालांपुढे मांडली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी उशिर का होतो याविषयी आमच्याकडे माहिती नाही. तसेच, त्या फाईलबद्दल विचारल्यावर राऊत म्हणाले की, "दुर्दैवाने ती फाईल समोर आली आहे. फाईलमध्ये काय आहे याचा लवकरच खुलासा करू."
 

बातम्या आणखी आहेत...