आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत, गणित जमले की माध्यमांसमोर मांडणार - संजय राऊत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत, गणित जमलं की माध्यमांसमोर मांडणार असल्याचे म्हणाले. हरियाणाचा तिढा लगेच सुटतो, महाराष्ट्राचा का नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. निवडणुकीचा निकाल येऊन 10 दिवस उलटून गेलेत मात्र अद्याप काही तोडगा काढण्यात आलेला नाही. 

शिवतीर्थावर होणार शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी
शिवसेना बाजारात बसलेला नाही, मुख्यमंत्रीपद भेटले नाही तर शिवसेना आपल्या ताकदीवर मुख्यमंत्री करेन. राज्यातील जनतेला माहीत आहे की, मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे. आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईन असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला आहे. सगळ्यात मोठ्या पक्षाकडून सत्तास्थापनेचा दावा नाही. 

त्या वक्तव्यामुळे भाजपसोबतची चर्चा थांबली
भाजपचं राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडे आहे. निवडणुकीपूर्वी ठरलेल्या गोष्टी घडल्याच नाही असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. असे वक्तव्य केल्यामुळेच चर्चा थांबवण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग
दबाव टाकण्यासाठी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात आला. मात्र तो त्यांच्यावर पलटला असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 

शरद पवारांचे केले कौतुक
शरद पवार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मात्र ते राज्याच्या राजकारणात येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठे आहेत. कालपासून पसरवल्या जाणाऱ्या अफवा कोठून येतात हे मला माहित असल्याचे संजय राऊत म्हणाले.