आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हम बुरे ही ठीक है', संजय राऊत यांचे लक्षवेधी ट्विट; भाजपला लगावला टोला    

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने ट्विट करत लक्ष वेधून घेत आहेत. त्यांनी गुरुवारी सकाळी ट्वीट करून भाजपर निशाना साधला आहे. संजय राऊत यांचे ''हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था'' हे ट्विट लक्षवेधी ठरले.  

भाजप-शिवसेनेतील सत्तास्थापनेतील समसमान वाटपावरून पेटलेला वाद विकोपाला गेल्याने शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी जाण्याचे ठरवले आहे. या तिन्ही पक्षांच्या दररोज बैठका, पत्रकार परिषदा होऊनही सत्तास्थापनेचा ठोस निर्णय समोर आलेला नाही.  बुधवारी झालेल्या चर्चेअखेर आघाडीतील दोन्ही पक्षांनी शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला सहमती दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम आणि सत्तावाटपावर अंतिम मोहोर उठल्याचेही कळते. तथापि, याची अधिकृत घोषणा झालेली नाही.