आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार स्थापनेत संजय राऊतांनी आचार्य अत्रेंप्रमाणे भूमिका मांडली, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांचे गौरवोद्गार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नाशिक : महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आचार्य अत्रे आणि त्यांचा मराठा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हाेणारच' असे आचार्य कायम मांडत हाेते. याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार उभे करण्यासाठी संजय राऊत आणि त्यांचा सामना यांनीही शिवसेनाचाच मुख्यमंत्री हाेणार, असे मांडत महत्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी काढले.

भुजबळ म्हणाले, दाेन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या जिल्ह्यातील सुमारे दीड लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासाठी दिड हजार काेटीहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणार असून त्यास कुठेही फाटा अथवा वाटा पडता कामा नये. प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी. गेल्या कर्जमाफीत जिल्ह्यात ६५० कोटी रुपये आले. मात्र, प्रत्यक्षात २५० कोटींचेच वाटप झाले. त्यामुळे आता दिलेल्या कर्ज माफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशी सूचना त्यांनी केली. शिवभोजन थाळीचा पायलट प्रोजेक्ट राज्यात सुरू करण्यात आला असून तो यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. मंत्रालयातील अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निर्मिती हाेऊन जिल्ह्याचे स्थानिक प्रश्न सोडविण्याचेे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे आले, असेही ते म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...