International Special / संजय राऊतांचे राज्यसभेतील भाषण पाकिस्तानात ठरले सुपरहीट, इस्लामाबादमध्ये लागले भाषणाचे पोस्टर्स

व्हिडिओमध्ये एक तरुण आपण पाकिस्तानी असल्याचे सांगत आहे

दिव्य मराठी

Aug 06,2019 09:04:00 PM IST

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील कलम 370 काढण्याला शिवसेनेने पाठिंबा देत निर्णयाचे स्वागत केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यासंबंधी राज्यसभेत जोरदार भाषण केले होते. सध्या हेच भाषण चांगलेच गाजत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या भाषणाचे पोस्टर्स थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही लागले आहेत. पाकिस्तानमधील एका तरुणाने याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय हे भारतीय आमच्याच देशात येऊन त्यांचे पोस्टर लावत असल्याबद्दल त्याने राग व्यक्त केला. तुर्तास हा व्हिडीओ खरा आहे का खोटा, याबाबत ठोस माहिती हाती आली नाहीये.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आपण पाकिस्तानी असल्याचे सांगत आहे. साजिद नावाच्या या तरुणाने त्याच्याच देशावर म्हणजे पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली आहे. आज जम्मू-काश्मीर घेतले, उद्या पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानही घेऊ असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. आपण कोणत्या दिशेने जातोय. आपल्याच देशात भारतीयांकडून असे पोस्टर लावले जात आहेत, असे तो तरुण म्हणत आहे.

कलम 370 रद्द करण्यासाठी राज्यसभेमध्ये शिवसेनेची भूमिका मांडली, त्याचेच हे पोस्टर पाकिस्तानमध्ये लागले आहेत. याचा अर्थ असा होतो की शिवसेनेने आपले विचार पाकिस्तानमध्ये पोहोचवले आहेत. "गुगलवर संजय राऊत इन पाकिस्तान सर्च केल्यावर व्हिडिओमध्ये संजय राऊत यांचे शिवसेनेचे विचार दिसत आहेत", असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

X