आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए!' देशातील परिस्थितीवर संजय राउत यांचे ट्विट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना खासदार आणि नेते संजय राउत आपल्या ट्विटमुळे आणखी चर्चेत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर दोन हिंदी वाक्य ट्विट करून अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या ट्विटमध्ये राउत म्हणाले, की लोकांना इतकीही भीती घालू नका की भीतीच संपून जाईल. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, की वादळांमध्ये बोटी आणि अंहाकारात मोठे लोक नेहमीच बुडतात. संजय राउत यांनी केलेले हे दोन्ही ट्विट देशातील एकूणच राजकीय परिस्थितीशी जोडून पाहिले जात आहेत.

संजय राउत यांचे भीतीवर ट्विट...

उल्लेखनीय बाब म्हणजे, देशभर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. एनआरसी आणि नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकावर निशाणा साधत आहेत. केंद्र सरकार देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. तसेच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत असे आरोप या विरोधकांकडून केले जात आहेत.