आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शपथविधी होता की, दशक्रिया विधी एवढ्या सकाळी सकाळी आटोपला', संजय राऊतांचे ट्वीट  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

मुंबई- राज्यातील राजकाराणाला कलाटणी मिळाली. एका रात्रीत राजकारणात बदलले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असं वाटत होतं. शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू असतानाच शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर आता शिवेसना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शपथविधी होता की, दशक्रिया विधी एवढ्या सकाळी सकाळी आटोपला" असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळीच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली
 
या सर्व घडामोडींशी शरद पवारांचा काहीही संबंध नाही. ईडीच्या नोटिशीनंतर अजित पवार जे वागले त्यानंतरच मला संशय आला होता. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.रात्रीच्या अंधारामध्ये पाप होते. दिवस असताना लोकांच्या समोर तुम्ही शपथ का घेतली नाही. याचाच अर्थ तुम्ही चोरी केली आहे. शिवसेना खंबीर आहे. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक होईल. काहीतरी चांगले घडत असताना हे सर्व पैसे आणि सत्तेचा वापर करून झाले आहे. काळोखातील पापे काळोखातच नष्ट होतात. डोळे उघडण्यापूर्वी ते नष्ट होतात. येथून पुढे जर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही."

बातम्या आणखी आहेत...