आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापित करत असेल तर त्यांना शुभेच्छा- चंद्रकांत पाटील, संजय राऊत म्हणतात...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- "शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. त्यामुळे आता आम्ही सरकार स्थापन करणार नाही. असे भाजपने राज्यपालांना कळवले आहे. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना, भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु, शिवसेना आमच्यासोबत येत नाही. शिवसेना जनादेशाचा अपमान करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापित करत असेल तर आमच्याकडून शुभेच्छा" असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापन करणार नसल्याचे सांगितले. भाजपच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.संजय राऊत म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्षात बसू पण शिवसेनेला ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देणार नाही, यातच भाजपचा अहंकार दिसतो. भाजपला मुख्यमंत्रीही बनवायचा होता आणि शिवसेनेसोबतचं वचनही पाळायचं नाही. असं कस चालेल...? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेकवेळा सांगितले आहे, मुख्यमंत्री सेनेचाच होईल." असे राऊत म्हणाले.आम्हाला नाही तर कोणालाच नाही, अशी भाजपची भूमिका आहे- माणिकराव ठाकरे

माणिकराव ठाकरे म्हणाले, ''आम्हाला नाही तर कोणालाच सरकार नाही, अशी भाजपची भूमिका आहे. राज्यावर पुन्हा निवडणुका लादण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, सत्तेसाठी आमचे प्रयत्न नाहीत, राज्याची एकूणच परिस्थिती पाहता या परिस्थितीत काय करता येईल, यासाठी काँग्रेसच्या आमदारांमध्ये चर्चा जयपूरमध्ये सुरू आहे. राज्यावर पुन्हा निवडणूक लादण्याचा भाजपचा डाव, काँग्रेस हाणून पाडेल," असेही ठाकरे यांनी सांगितले.