आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अखेर संजू सॅमसन अडकला विवाहबंधनात; म्हणाला, पाच वर्षे सोबत होतो पण एकदाही सार्वजनिक ठिकाणी फिरू शकलो नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेटर संजू वी सॅमसन त्याची प्रियसी चारुलता हे शनिवारी विवाह बंधनात अडकले. तिरुवनंतपूरममधील एका अलिशान हॉटेलमध्ये प्रमुख पाहुणे आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. विवाह सोहळ्याच्या दिवशी संजूने पारंपारिक पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि धोती परिधान केली होती. तर चारुलता खास प्रकारच्या साडीवर विविध प्रकारच्या दाग-दागिन्यांनी सजलेली होती. संजू आयपीएल आणि चॅम्पियंस लीग टी-20 मध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात युवा क्रिकेटपटू आहे. त्याला आयपीएल 2013 मध्ये सर्वात श्रेष्ठ युवा खेळाडूचा किताब देण्यात आला होता. 

 

संजू आणि चारु यांच्या प्रेमाची गोष्ट फार गमतीशीर आहे. संजूने स्वत: फेसबुकवरुन दोघांच्या प्रेमाचा खुलासा केला होता. सप्टेंबर 2018 मध्ये संजूने चारुसोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला होता. त्या फोटोखाली त्याने लिहले होते की, '22 ऑगस्ट, 2013 ला रात्री 11.11 वाजता मी चारुला एक 'Hi' पाठवला होता. तेव्हापासून आजपर्यंत आमच्या रिलेशनला 5 वर्षे उलटले. तरीही आजपर्यंत मी चारुसोबत एक फोटो शेअर करण्याची संधी शोधत होतो. मी जगाला सांगू इच्छितो की मी चारुशी किती प्रेम करतो आणि ती माझ्यासाठी किती खास आहे.' 

 

संजूने पुढे असेही लिहले की, 'आम्ही एकत्र वेळ घालवत होतो परंतू आम्ही सार्वजनिकरित्या कधीच फिरु शकलो नाही.' अशाप्रकारे संजूने आपल्या प्रेमाचे किस्से शेअर करत संजू आणि चारु हे इवानियोस कॉलेजमध्ये सोबत शिक्षण घेत होते. सप्टेंबर महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. 

 

पुढील स्लाइडवर पाहा Photos...

 

बातम्या आणखी आहेत...