आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : न्यूझीलंड दौऱ्यासाठी रविवारी भारताच्या १६ सदस्यीय संघाची घोषणा झाली. संजू सॅमसनला या संघातून बाहेर करण्यात आले आहे. त्याला श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली होती. त्यात तो केवळ ६ धावाच करू शकला. या मालिकेदरम्यान रोहित शर्माला विश्रांती मिळाली होती. रोहितसह मोहम्मद शमीनेही पुनरागमन केले आहे. दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याचा विचार झाला नाही. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा अजून व्हायची आहे. पंड्याचा तंदुरुस्ती वाद यामागचे मुख्य कारण. तंदुरुस्ती चाचणीत तो नापास झाल्याचे वृत्त होते. मात्र त्याच्या प्रशिक्षकाने अशी चाचणीच झाली नसल्याचे सांगितले होते. टी-२० संघ असा : विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.