आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या शोमध्ये दिसला संजूचा खट्याळ अंदाज, म्हणाला मला माझी 309 वी गर्लफ्रेंड मिळाली, तिचे नाव आहे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असलेला 'पानिपत' हा चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. यानिमित्ताने सध्या ही संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाच्या  प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनच्या निमित्ताने अलीकडेच संजय दत्त, क्रिती आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचले होते. यावेळी संजयचा खट्याळ अंदाज  उपस्थितांना बघायला मिळाला. 

  • कपिलच्या या प्रश्नावर संजयने दिला पंच...

शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माने संजय दत्तला ‘संजू’ चित्रपटात दाखवल्या प्रमाणे 308 गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यावर संजय दत्तने मजेशीर उत्तर दिले आहे. मी माझ्या गर्लफ्रेंड किती झाल्या हे मोजत असतो आणि ते कायम मोजत राहणार. कारण माझा जीवन प्रवास अजून संपलेला नाही. 'पानिपत' चित्रपटातील क्रितीच्या भूमिकेने मी प्रभावित झालो आहे आणि ती सहजपणे माझी 309 वी गर्लफ्रेंड होऊ शकते असे संजय म्हणाला आहे.

  • पानिपतच्या तिस-या युद्धावर बेतला आहे चित्रपट...

बातम्या आणखी आहेत...