आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Makar Sankranti 2019 : 15 जानेवारीपासून सुरु होतीय मकर संक्रांत, सूर्याला रोज सकाळी जल अर्पण केल्याने त्वचेची वाढते चमक आणि दूर होतो आळस; यामुळे जुन्या काळापासून चालत आली आहे प्रथा प्रथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रिलिजन डेस्क : 15 जानेवारी रोजी सूर्यपुजेचे पर्व मकर संक्रांत आहे. या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे आणि सुर्याला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. शास्त्रांमध्ये सूर्याला पंचमहाभूतांमध्ये स्थान देण्यात आले आहे. रोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा पुरातण काळापासून चालत आली आहे. यामुळे धर्म लाभासोबतच आरोग्य लाभ देखील होतो. सूर्याला अर्घ्य दिल्याने त्वचेची चमक वाढते, आळस दूर होतो आणि डोळ्यांची नजर देखील तल्लख होते. पुराणातील ब्रम्हपर्वमध्ये श्रीकृष्ण आणि सांब यांचा या परंपरेविषयी संवाद आहे. सांब हा श्रीकृष्णाचा मुलगा होता. या संवादामध्ये श्रीकृष्णांनी सांबला सूर्य देवतेची महिमा सांगितलेली आहे. श्रीकृष्णच्या मते, सूर्यदेव एकमात्र प्रत्यक्ष देवता आहे. म्हणजे आपण सूर्यदेवाला थेट पाहू शकतो. जो भक्त पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा करतो  भगवान सूर्यदेव त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. 

 

श्रीकृष्णाने सांबला सांगितले की, त्यांनीही स्वतः सूर्यदेवाची पूजा केलेली आहे आणि या पूजेमुळे त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. 

 

तुम्ही देखील दररोज सूर्याची पूजा करत असाल तर तुम्हालाही शुभ फलप्राप्ती होऊ शकते.

 

 

 भविष्य पुराणानुसार श्रीकृष्णाने सूर्यपूजेविषीयची काही खास गोष्टी

सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवला जल अर्पण करावे. यासाठी तांब्याचे भांड्यात पाणी भरा, त्यात तांदूळ, फूल टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.

 

> जल अप्रित केल्यानंतर सूर्यमंत्राचा जाप करावा. या जापासोबतच शक्ती, बुद्धी, आरोग्य आणि सम्मानाची मनोकामना करावी


सूर्य मंत्र - ऊँ खखोल्काय स्वाहा


> या प्रकारची सूर्यची आराधना केल्यानंतर धूप, दीपने सूर्यदेवाचे पूजन करावे.

 

> सूर्याशी संबंधित गोष्टींचे दान करावे. जसे की, तांब्याचे भांडे, पिवळी किंवा लाल कपडा, गहू, गूळ, माणिके, लाल चंदन इत्यादींचे दान करावे. आपल्या श्रद्धेनुसार वरील सांगण्यात आलेल्या गोष्टींमधून कोणतीही गोष्टीचे दान देऊ शकता. दान दिल्यामुळे कुंडलीमधील सूर्यदोष दूर होऊ शकते. 
 

 

बातम्या आणखी आहेत...