आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख-शांती : पती-पत्नीने एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास कुटुंबात सुख राहते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत कबीर रोज सत्संग करत होते. दूरदृवरून लोक त्यांचा सत्संग ऐकण्यासाठी येत होते. एके दिवशी सत्संग समाप्त झाल्यानंतर एक व्यक्ती तेथेच बसून राहिला. कबीर यांनी त्याला कारण विचारले तर व्यक्तीने सांगितले की, मी गृहस्थ असून माझ्या पत्नीसोबत माझे दररोज वाद होतात. माझी ही समस्या कशी दूर होऊ शकते?


कबीर थोडावेळ शांत बसून राहिले आणि नंतर त्यांनी आपल्या पत्नीला कंदील लावून आणण्यास सांगितले. पत्नीनेही असेच केले. त्या व्यक्तीने विचार केला की, भरदुपारी कबीर यांनी कंदील का मागवला? थोड्यावेळाने कबीर यांनी पत्नीला काहीतरी गोड घेऊन ये असे सांगितले. यावेळी त्यांच्या पत्नीने गोडऐवजी चटपटीत पदार्थ दिला आणि निघून गेली.


थोड्यावेळाने तो व्यक्ती म्हणाला- कबीरजी मी निघतो. कबीर यांनी विचारले- तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान मिळाले की अजून काही संशय मनात आहे? व्यक्ती म्हणाला- माझ्या काहीच लक्षात आले नाही. कबीर म्हणाले की, मी पत्नीकडे कंदील मागितल्यानंतर ती म्हणू शकत होती की एवढ्या दुपारी तुम्हाला कंदील कशाला पाहिजे. परंतु तिने विचार केला की काहीतरी काम असेच यामुळेच मागवला असेल.


गोड मागवले तर चटपटीत देऊन निघून गेली. घरात काही गोड नसेल असेही असू शकते. हा विचार करून मी गप्प बसलो. एकमेकांविषयी आत्मविश्वास वाढवणे आणि वादामध्ये न अडकल्याने विषम परिस्थिती आपोआप दूर होते. हे एकूण व्यक्ती चकित झाला. त्याच्या लक्षात आले की, कबीरांनी हे सर्वकाही माझ्यासाठी केले होते.


कबीर म्हणले की- गृहस्थ जीवनात एकमेकांविषयी विश्वास असेल तरच ताळमेळ साधतो. पुरुषाकडून चूक झाली स्त्रीने सांभाळून घ्यावी आणि एखादी चूक स्त्रीकडून झाली तर पतीने त्याकडे दुर्लक्ष करावे. हाच गृहस्थीचा मूळमंत्र आहे.


लाईफ मॅनेजमेंट
पती-पत्नीचे नाते तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा ते एकमेकांच्या भावना समजून घेतील आणि सन्मान देतील. दोघांपैकी कोणाकडूनही एखादी चूक झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे. याच ताळमेळाने पती-पत्नी सुखी जीवन जगू शकतात.

बातम्या आणखी आहेत...