आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Santa Run' Competition In Victoria Park; Funds Raised For Children With Serious Illnesses

व्हिक्टोरिया पार्कमध्ये 'सांता रन' स्पर्धा; गंभीर आजारी असणाऱ्या मुलांसाठी उभारला निधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन : लंडनमधली व्हिक्टोरिया पार्कमध्ये रविवारी लंडन सांता रन ही स्पर्धा पार पडली. सुमारे ३००० पेक्षा जास्त स्पर्धक सांताक्लाॅजचा वेश परिधान करून या स्पर्धेत सहभागी झाले होते. ५ किमी आणि १० किमी अशा दोन प्रकारांत ही स्पर्धा पार पडली. ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हाॅस्पिटलमधील गंभीर आजारी मुलांसाठी निधी उभारणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. ख्रिसमसनिमित्त या मुलांना दिलेली ही मोठी भेट मानली जाते. प्रौढांसाठी २२ युरो आणि १६ वर्षांखालील मुलांसाठी १२ युरो असे शुल्क या स्पर्धेसाठी आकारण्यात आले होते. त्यातून स्पर्धकांना सांता सूट आणि खाण्यापिण्याचे पदार्थ देण्यात आले

बातम्या आणखी आहेत...