आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा संताेष ट्राॅफीच्या पात्रता फेरीचे सामने; यजमान टीमचा मुख्य फेरी गाठण्याचा दावा; उद्यापासून स्पर्धा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर - देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या संताेष ट्राॅफी फुटबाॅल स्पर्धेच्या पश्चिम विभागीय स्पर्धेच्या अायाेजनाची संधी महाराष्ट्राला मिळाली. तब्बल ७१ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच तीन वेळचा चॅम्पियन महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेच्या पश्चिम विभागीय पात्रता फेरीच्या सामन्याचे अायाेजन करण्यात अाले. महाराष्ट्रामध्ये प्रथमच ही पात्रता फेरी हाेत अाहे. राज्यातील युवांसाठी ही माेठी पर्वणीच अाहे. 


साेलापूर येथे उद्या गुरुवारपासून संताेष ट्राॅफी फुटबाॅल स्पर्धेला सुरुवात हाेईल. ही स्पर्धा शहरातील (पार्क) इंदिरा गांधी स्टेडियमवर ही स्पर्धा ७ ते १२ फेब्रुवारीदरम्यान होणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त व स्पर्धा समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 
या स्पर्धेत देशातील आठ संघ भाग घेणार आहेत. महाराष्ट्र संघात हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी व सोलापूर स्पोर्ट‌्स इन्स्टिट्यूट फुटबॉल अकादमीचा खेळाडू ओंकार मस्के याचा समावेश आहे. या स्पर्धेचे उद््घाटन सहा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अनेकर, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड व वालचंद शिक्षण समूहाचे सचिव डॉ. रणजित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता होईल. या वेळी जिल्हा क्रीडा महासंघाचे सचिव महेश गादेकर, स्पर्धा सचिव प्रा. डॉ. किरण चौगुले, खजिनदार आनंद चव्हाण आदी उपस्थित होते. 


स्पर्धेची गटवार विभागणी : अ गट : गोवा, मध्यप्रदेश, दमण व दीव, लक्षद्वीप. ब गट : महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, दादरा व नगर हवेली. 


३२ सर्वाधिक वेळा पश्चिम बंगाल संघ ठरला चॅम्पियन 
संताेष ट्राॅफी फुटबाॅल स्पर्धेच्या इतिहासामध्ये पश्चिम बंगालचा संघ हा सर्वाधिक यशस्वी अाहे. या टीमने अातापर्यंत ३२ वेळा ही प्रतिष्ठेची ट्राॅफी पटकावली अाहे. तसेच या संघाने १३ वेळा उपविजेतेवर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील अापले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी पश्चिम बंगालने ४५ वेळा या स्पर्धेची फायनल गाठली. त्यापाठाेपाठ पंजाब संघाने ८ वेळा ही ट्राॅफी जिंकली. तसेच ७ वेळा उपविजेतेपद पटकावले. यात महाराष्ट्र अाठव्या स्थानावर अाहे. या संघाने तीन वेळा जेतेपद अाणि ५ वेळा उपविजेतेद पटकावले अाहे.

 
असा अाहे महाराष्ट्राचा संघ : लिनेकर मचाडाे (कर्णधार), डायन मेन्जीस, दुर्वेश निजाप, मृणाल तांडेल, जयेश कदम, अमन गायकवाड, राेहन शुक्ला, विनाेद पांडे , अारीफ शेख, अल अझर दिल्लीवाला, िलंडर धर्माेई (सर्व मुंबई), राेहन फासगे, राहुल कडलाग (दोघे पुणे), संकेत साळाेखे (काेल्हापूर), अाेवेस खान, माे. गुलाम, राहुल नेवारे, सागल चिंताला (सर्व नागपूर), विकी दाते (अमरावती), अाेंकार म्हस्के (साेलापूर), संघाचे प्रशिक्षक : रितेश इनुमला. व्यवस्थापक : उद्यान बॅनर्जी 


रिक्षाचालकाच्या मुलाची संतोष ट्रॉफीसाठी निवड 
रिक्षाचालकाच्या मुलाची संतोष ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील रिक्षा चालवतात. प्रशिक्षणासाठी व किटसाठी पैसे नसताना प्रशिक्षकांनी त्याला मदत केली. त्याचे चीज ओंकार मस्केने केले. संतोष पांढरेनंतर खेळणारा सोलापुरातील हा दुसरा खेळाडू. संतोष ट्रॉफीसाठी जिल्ह्यातून १५० व राज्यातून ३०० खेळाडूंतून त्याची निवड झाली. उजवीकडील संरक्षक म्हणून निवडला गेला. 


गुरूंमुळेच मी घडलो 
देशातील प्रतिष्ठेच्या ट्रॉफीसाठी निवड झाल्याचा मला आनंद आहे. माझ्याअगोदर २ संतोष ट्रॉफी खेळलेला किरण पांढरे याच्यामुळे मी फुटबॉलमध्ये आलो. तेव्हा मी. ह. दे. प्रशालेत आठवीत शिकत होतो. सोलापूर स्पोर्ट््स इन्स्टिट्यूट फुटबॉल अकादमीमध्ये माझा खेळ पाहून किरण चौगुले व किरण दुस्तगर यांनी मला प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क घेतले नाही. फुटबॉलची कीटही मोफत दिली. त्यामुळेच मी तीन राज्य स्पर्धा खेळलो. 
- ओंकार मस्के 


महाराष्ट्राची अाजवरची कामगिरी 
 तीन वेळा जिंकला किताब 

१९६३-६४ मध्ये पहिल्यांदा चॅम्पियन हाेण्याचा बहुमान 
२६ वर्षंानंतर जिंकली दुसऱ्यांदा संताेष ट्राॅफी. १९९० मध्ये विजेता. 
१९९९ मध्ये जिंकली शेवटची ट्राॅफी; केरळावर मात 
 अाठ वेळा गाठली फायनल; पाच वेळा उपविजेतेपदावर मानावे लागले टीमला समाधान 


डीएसकेकडून माेठा अनुभव; अाता यजमानांसाठी हुकमी एक्का 
पुण्यातील प्रतिभावंत फुटबाॅलपटू राहुल कडलग हा अापले काैशल्य पणास लावणार अाहे. त्याला यजमान महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे यजमानांचा मुख्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्याचा त्याचा मानस अाहे. त्याला दाेन वेळा अाय लीग खेळण्याचा अनुभव अाहे. डीएसके टीमचा अव्वल खेळाडू म्हणून सागरची अाेळख अाहे. त्यामुळे अाता ताे यजमान टीमसाठी हुकमी एक्काच मानला जाताे. 
- कर्णधार लिनेकर मचाडो 
 

 

बातम्या आणखी आहेत...