आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी द्रव्य पाजवून संयुक्ताचा घात केल्याची पित्याची फिर्याद; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कोणीतरी धमकी किंवा फसवणूक करून संयुक्ता हिला मार्डी रोडवरून घेऊन जाऊन तिला जबरदस्तीने विषारी द्रव्य पाजवून तिचा घात केला, अशी फिर्याद संयुक्ता हिचे वडील रमेश भैरी यांनी तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली. 


मृत संयुक्ता रमेश भैरी (वय १९, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकुल) ही दयानंद कॉलेजमध्ये शिकत होती. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत. 


मित्रमंडळींकडे चौकशी
घटना घडल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्ता हिच्या आई-वडिलांचे जबाब घेतले. यानंतर दयानंद कॉलेजमधील मित्रमैत्रिणींचा जबाब घेतला जात आहे. तसेच मोबाइलवरील कॉल रेकॉर्डसुध्दा तपासले जात आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...