आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चनही अडकणार #MeToo च्या वादळात, हेअर स्टाइलिस्ट सपना म्हणाली, \'तुम्हाला किंमत मोजावी लागेल\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड जगताता सध्याला फक्त चर्चा होतेय ती MeToo अभियानाची. तनुश्री दत्तानंतर आता अनेक जणी त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. या यादीत नाना पाटेकरांसह साजिद खान, आलोकनाथ, सुभाष घई, चेतन भगत, लव रंजन अशा अनेक मोठ्या लोकांची नावे असून त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लागला आहे. आता या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव जोडले गेले आहे.

 

सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी अमिताभ बच्चन यांच्याबाबत अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन केले आहे त्या महिलांनीही पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. ज्यामुळे महानायकाचा बुरखा फाटेल अशा आशयाचे एक ट्विट सपना भवनानीने केले आहे.तसेच ट्विटरच्या माध्यमातून सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना इशाराच दिला आहे. 

 

you will pay! #MeToo #MeTooIndia https://t.co/Oi4MqGb1hz

— Sapna Moti Bhavnani (@sapnabhavnani) October 12, 2018

 

Have personally heard so many stories of Bachchan’s sexual misconduct and I I hope those women come out. His hypocrisy is sooooo tired. #Metoo #MeTooIndia https://t.co/2BpumLoYlF

— Sapna Moti Bhavnani (@sapnabhavnani) October 11, 2018


तुमचा पिंक सिनेमा आला आणि त्यात तुम्हाला जणू काही एक चळवळकर्ते म्हणूनच सादर केले गेले. मात्र तुमचे सत्य लवकरच बाहेर येईल याची मला खात्री आहे. MeToo या मोहिमे अंतर्गत जेव्हा तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे प्रकरण समोर आले तेव्हा अमिताभ यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी माझे नाव तनुश्री दत्ता नाही आणि नाना पाटेकरही नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबरला आणि त्याआधी MeToo या मोहिमेबाबत ट्विट करत महिलांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, अन्याय सहन करायला नको असे ट्विट केले होते.

 

 

This has to be the biggest lie ever. Sir the film Pink has released and gone and your image of being an activist will soon too. Your truth will come out very soon. Hope you are biting your hands cuz nails will not be enough. @SrBachchan #Metoo #MeTooIndia #comeoutwomen https://t.co/gMQXoRtPW3

— Sapna Moti Bhavnani (@sapnabhavnani) October 11, 2018

 


या सगळ्या ट्विटचा आधार घेत सपना भवनानी यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही महिलांबद्दल लिहिलेले ट्विट हे धादांत खोटे आहेत. तुम्ही जे काही वागला आहात ते आठवून तुम्ही तुमची नखं कुरतडू नका, तुमचे सत्यही लवकरच बाहेर येईल आणि तुम्हालाही याची किंमत चुकवावी लागेल असेही सपना भवनानीने म्हटले आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...