आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताचे खंडन केल्याच्या दिवशीच सपना चौधरीने घेतली भाजप नेत्याची भेट; एकाच टेबलावर केले डिनर, काढला सेल्फी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रसिद्ध हरियाणवी सिंगर आणि डान्सर सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तास नकार दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी एक झटका दिली. सपना आता भाजप नेते आणि खासदार मनोज तिवारी यांच्या संपर्कात आहे. पत्रकार परिषद घेऊन तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त नकारले त्याच दिवशी तिने तिवारी यांच्यासोबत डिनर केला. या दोघांनी डिनर टेबलावरून काही सेल्फी देखील काढल्या. तिवारी यांनीही आपण सपनाच्या संपर्कात आहोत असे सांगितले आहे. त्यामुळे, काँग्रेसचा कथित प्रस्ताव झुगारून सपना आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा उडाली आहे.

 

सपना खोटे बोलत आहे -काँग्रेस
सपना चौधरीने शनिवारीच दिल्लीतील काँग्रेस नेते नरेंद्र राठी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे वृत्त आले होते. परंतु, सपना चौधरीने रविवारी पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही असे सांगितले. सोशल मीडियावर पसरवला जाणारा फोटो देखील जुना आहे असा दावा तिने केला. यानंतर काँग्रेसने सुद्धा सपना चौधरी खोटे बोलत असल्याचा आरोप केला. आता सोशल मीडियावर सपना चौधरीने कथितरित्या काँग्रेस जॉइन केल्याचा एक फॉर्म सुद्धा फिरत आहे. त्यावर सपनाचा फोटो आणि तारीख 23 मार्च 2019 अशी आहे. काँग्रेस जॉइन केल्यानंतर तिने अचानक आपला निर्णय बदलला असे आरोपही राठी यांनी केले आहेत. विशेष म्हणजे, सपना चौधरीने पत्रकार परिषदेत जो पिंक ड्रेस घातला होता, तोच ड्रेस तिने तिवारी यांच्यासोबत डिनर करतानाही घातल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, या दोन्ही घडामोडी एकाच दिवशी घडल्या असेही सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...