आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडी नेसून केलेला सपना चौधरीचा डान्स होत आहे व्हायरल, \'टल्ली होकर नाचण दे\' गाण्यावर थिरकली सपना तर खूप वेळ वाजत राहिल्या टाळ्या : Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सपना चौधरी काँग्रेसमध्ये सामील झाल्याच्या बातमीबरोबरच तिचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सपना चौधरी नेहमीप्रमाणे थोडी वेगळी दिसत आहे. झाले असे की, सपना या व्हिडिओमध्ये साडी नेसून 'टल्ली होकर नाचण दे' या गाण्यावर डान्स करत आहे. सपनाचे डान्स मूव्हज पाहून तिथे असलेले लोक जोरजोरात टाळ्या  वाजवत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ येताच लोकांनी सपनाचे कौतुक करायला सुरुवात केली आहे. एका व्यक्तीने लिहिले, 'अरे खूप छान डान्स केला मॅडम.' 

सपनाने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातमीचे केले खंडन...
डान्सर सपना चौधरीने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. पण याबद्दल ती म्हणाली की, मी कोणतीही पार्टी जॉईन केलेली नाही आणि कधी करणारही नाही. मात्र, प्रियांका गांधीसोबतच्या तिच्या फोटोबद्दल ती म्हणाली की, तो खूप जुना आहे आणि आता व्हायरल होत आहे.