Viral Video / जेव्हा 'गोली चल जावेगी' गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके... हैराण झाले लोक, व्हिडिओ व्हायरल

आपल्या चाहत्याचा डान्स पाहून सपनाने फॉलो केल्या त्याच्या डान्स स्टेप्स
 

दिव्य मराठी

May 14,2019 12:35:00 PM IST

बॉलीवूड - हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या डान्सबाबत सर्वांनाच माहीत आहे. आज ती डान्सच्या जोरावरच शिखरावर आहे. आपल्या डान्समुळे तिने फक्त हरियाणा नाही तर संपूर्ण देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ती देशभरात मोठ-मोठ्या कार्यक्रमांसाठी तिला आमंत्रित केले जाते. सपनाचा दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.


सध्या सपनाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती गुलाबी रंगाच्या लहंग्यात डान्स करताना दिसत आहे. सपनाने हा व्हिडिओ आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. ती देहरादून येथील एका कार्यक्रमात परफॉर्म करत आहे. 'गोली चल जावेगी' या हरियाणवी गाण्यावर ती ठुमकताना दिसतीये. तेथील उपस्थित लोक डान्स करत सपनाचा व्हिडिओ शूट करत आहेत.


सपनाचा व्हिडिओ व्हायरल होणे मोठी गोष्ट नाहीये. ती जिथे डान्स करते तेथील लोक तिला पाहून थिरकण्यास सुरूवात करतात. यापूर्वी सपनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक चाहता तिच्यासोबत डान्स करत आहे. आपल्या चाहत्याचा डान्स पाहून सपना देखील त्याच्या स्टेप्स फॉलो करत होती.

X