Home | TV Guide | sapna choudhary in sunil grover's show kanpurwale khurana's

सपना चौधरीला सुनील ग्रोवरने दिली डान्समध्ये टक्कर, हरियाणवी डान्सरने दाखवल्या मनमोहक अदा तर कॉमेडियनचा डान्स पाहून खळखळून हसली ऑडियंस, नंतर सपनाला सायकलवर बसवून फिरवताना दिसला सुनील : Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 29, 2019, 12:15 AM IST

पहिल्या प्रोग्रामसाठी सपनाला मिळाले होते 3100 रुपये, आता घेते लाखो... 

  • sapna choudhary in sunil grover's show kanpurwale khurana's

    एंटरटेन्मेंट डेस्क : हरियाणवी डान्सर, सिंगर सपना चौधरी बिग बॉस 11 ची कंटेस्टेंट झाल्यापासून सतत यशाकडे वाटचाल करत आहे. लवकरच सपना बॉलिवूडमध्ये फिल्म 'दोस्ती के साइड इफेक्ट' ने डेब्यू करणार आहे. याच फिल्मच्या प्रमोशनसाठी सपना अशातच सुनील ग्रोवरचा शो 'कानपुर वाले खुरानाज' च्या सेटवर पोहोचली होती. लॉन्‍ग अनारकली कुर्ता घातलेली सपना खूप सुंदर दिसत होती. यादरम्यानच सपना चौधरीने सुनील ग्रोवरसोबत शोमध्ये आपले फेमस गाणे 'तेरी आंख्या का यो काजल...' वर जबरदस्त डान्स केला. सपनाने यादरम्यान सुनीलला डान्सच्या स्टेप्स शिकवल्या. खास ही आहे की, सपनासोबत सुनीलही तिला डान्समध्ये बरोबरीने टक्कर देत होता. तसेच सपना चौधरीने कॉमेडियन सुगंधा मिश्रालाही आपल्या या गाण्याच्या काही स्टेप्स शिकवल्या. शोमध्ये बसलेली ऑडियंस सपनाचा डान्स पाहून नाचू लागली. एवढेच नाही तर शोची जज फिल्म दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर फराह खाननेही सपना चौधरीचा हा परफॉर्मेंस खूप एन्जॉय केला. सपना चौधरी 12 वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आई, भाऊ बहिणींची जबाबदारी सपनावरच पडली. त्यानंतर सपनाने सिंगिंग आणि डांसिंगमध्ये आपले करियर बनवले आणि आपले पूर्ण घर ती सांभाळू लागली. आता एका प्रोग्रामसाठी लाखो रुपये घेणारी सपना चौधरीला तिच्या पहिल्या प्रोग्रामसाठी केवळ 3100 रुपये मिळाले होते.

Trending