आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्या कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीला पाहून हैराण आहे सपना चौधरी, जेव्हा विचारले याचे कारण तर काही सांगू शकली नाही, पण तिच्या आईने दिले मजेशीर उत्तर 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : हरियाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरी स्टेजवर असेल आणि गर्दी होणार नाही असे होऊच शकत नाही. तिच्या इव्हेंटमध्ये प्रत्येक वयाचे लोक तिचा डान्स पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येमध्ये पोहोचतात. ही गर्दी कुठून येते आणि लोक तिला एवढे पसंत का करतात ? 

जेव्हा तिला विचारले गेले तेव्हा हे होते सपनाचे उत्तर... 
सपनाने एका मीडिया हाउसला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले, 'मला स्वतःलाच नाही माहित कि ही गर्दी कुठून येते. मी याबद्दल माझ्या आईला विचारले की, हे लोक येतात तरी कुठून ? सपनाने सांगितले की, तिच्या आईने यावर खूप मजेशीर उत्तर दिले होते. आई म्हणाली होती, 'तू हसतेस आणि तुझे हसणे पाहण्यासाठीच ही एवढी गर्दी जमा होते.' सपनालादेखील वाटते की, तिच्या हसण्यामुळेच इतके लोक तिला पाहायला येतात. 

स्वतःला डान्सर मनात नाही सपना... 
इंटरव्यूदरम्यान सपनाने सांगितले, 'मी स्वतःला डान्सर मनात नाही.' रियलिटी शो 'बिग बॉस'मुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती. तो बॉलिवूडसोबतच भोजपुरी फिल्ममधेही काम करत आहे. तिचे म्हणणे आहे की, तिला अजून आयुष्यात खूप काही मिळवायचे आहे. सपना संजय दत्तची फॅन आहे. पण जर फेव्हरेट अभिनेत्रींव्हीषयी म्हणाल तर सपना स्वतःलाच बेस्ट मानते. 

वुमन्स डेला स्वतःला गिफ्ट केली कार... 
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सपनाने स्वतःला एक कार गिफ्ट केली आहे. सपनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर करून या कारबद्दल आपल्या चाहत्यांना सांगितले. तिने 28 - 33 लाख रुपयांची एक फोर्ड एंडेवर खरेदी केली आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सपना स्टेज शोजबरोबरच आता फिल्ममधेही काम करत आहे. तिने बॉलिवूडमधील फिल्म 'दोस्ती के साइड इफेक्ट्स' मध्ये आयपीएसचा रोल केला होता. ती 'वीरे की वेडिंग' आणि 'नानू की जानू' मध्ये आयटम नंबरदेखील केले आहे.