Home | News | Sapna Choudhary kissed by a man while performing on stage, video goes viral

स्टेजवर परफॉर्म करत होती सपना चौधरी, तो अचानक आला आणि केले Kiss; व्हायरल झाला Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 14, 2019, 04:07 PM IST

या घटनेच्या अवघ्या काही मिनिटांतच त्या व्यक्तीचे सत्य समोर आले.

  • Sapna Choudhary kissed by a man while performing on stage, video goes viral

    मुंबई - जगभरात व्हॅलेनटाईन वीक साजरा करण्यात आला. या दरम्यान रोज विशिष्ट प्रकारचे दिवसही साजरा करण्यात आले. त्यापैकीच एक Kiss Day मध्ये प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये हरियाणाची डान्सर स्टेजवर परफॉर्म करत होती. त्याचवेळी अचानक एक व्यक्ती आला आणि त्याने सपना चौधरीला किस केल्यासारखे वाटले. हा व्हिडिओ 21 एप्रिल 2018 रोजी फरीदाबाद येथील इव्हेंटचा आहे. या कार्यक्रमात सपना उशीरा पोहोचली होती. थकव्यामुळे ती व्यवस्थित परफॉर्म सुद्धा करू शकत नव्हती. त्याचवेळी ही घटना घडली.


    सपना चौधरी स्टेजवर डान्स करत असताना अचानक एक युवक सुद्धा स्टेजवर आला. सुरुवातीला तिच्यासोबत डान्स केला. यानंतर तिला मिठी मारली आणि गालावर किस केले. अचानक घडलेली ही घटना पाहून सर्वांनाच धक्का बसला. काहींना तो सपनाचा पती असावा असे वाटले. तर काहींनी तो तिचा प्रियकर असावा असे अंदाज लावले. परंतु, काही वेळातच सत्य समोर आले. सपनाला स्टेजवर मिठी मारणाऱ्याचे नाव करण मिर्जा होते. करण आणि सपना एकमेकांना भाऊ-बहीण मानतात. करण आणि सपनाने हरियाणवी साँग 'टोक लाग जा' वर परफॉर्म केले होते. सपना त्या दिवशी त्याच गाण्यावर डान्स करत होती. त्यामुळे, करण सुद्धा स्टेजवर आला आणि त्याने तिच्यासोबत परफॉर्म करण्यास सुरुवात केली.

Trending