आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी बनली आहे सेलिब्रिटी पण आई मात्र अजूनही करते चुलीवर स्वयंपाक, सपना चौधरीच्या आईचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले, 'ही आहे देशी'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरी एकदा पुन्हा आपल्या नवीन व्हिडीओमुळे चर्चेत आहे. सपना चौधरीने आपली आई नीलम चौधरीचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडिओमध्ये सपनाची आई पोळ्या करताना दिसत आहे. खास गोष्ट ही आहे की, सपना चौधरीची आई मातीच्या चुलीवर ताव ठेऊन पोळ्या करत आहे. व्हिडिओमध्ये सपनाची आई पोळ्या करताना दिसत आहे तर बॅकग्राउंडमध्ये सपना चौधरीच आवाजही आहे. सपना आपल्या आईला विचारते की, तू काय करत आहेस ? त्यावर तिची आई म्हणते की, मी पोळ्या करत आहे. नंतर सपना तिथे बसलेल्या अजून एका महिलेसोबत बोलते. हा व्हिडीओ इंस्टाग्राम पेज @isapnachaudhary वर शेयर केला गेला आहे. सपनाचे फॅन्सही या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे की, ' हे आहे देसी'. तर काहीजण सपनाचे कौतुक कार्य आहेत. एका यूजरने लिहिले, "सपना मानले तुला इतके पैसे असूनही तू देसी स्टाइलमध्ये राहते". दुसऱ्या यूजरने लिहिले, "आई तर आई असते सपना जी". सपनाची पहिली फिल्म ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ लवकरच रिजील होणार आहे. या फिल्ममध्ये सपना चौधरी पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...