आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी रेसलरचा मार खाऊनही राखीला घडली नाही अद्दल, पुन्हा रिंगमध्ये येऊन दिले आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. ज्या रिंगमध्ये राखीला विदेशी रेसलरने आपटले होते. त्याच रिंगमध्ये राखी पुन्हा परतली आहे. येथे येताच राखी म्हणाली की - आज रेबेलसोबत सामना झाला नाही याची खंत आहे. यावेळी राखीसोबत रिंगमध्ये सपना चौधरीही दिसली. सध्या हरियाणाच्या करनालमध्ये सीडब्ल्यूई फाइट सुरु आहे. फाइट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. तर दूसरीकडे रिंगमध्ये रेसलरसोबत आर्टिस्टही डान्स परफॉर्मेंस देत आहेत. या दरम्यान राखी आणि सपना चौधरीने पुन्हा रिंगमध्ये परफॉर्मेंस दिला. या वेळी अर्शी खान, पंजाबी सिंगर खान साहबने डान्स केला. फाइटनंतर सपना चौधरी जात होती, तेव्हा तिच्या अवती भोवती गर्दी जमा झाली. बहिणीला वाचवण्यासाठी सपनाच्या भावाने हवेत गोळीबार केला. पोलिसांनी सपनाच्या भावाला अटक करुन चौकशी करुन सोडून दिले. याच आठवड्यात बिहारमध्ये सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ झाला होता. यामध्ये पोलिसांच्या लाठी हल्ल्यात एकाचा मृत्यूही झाला. 


रेबेलला चॅलेंज करणे राखीला महागात पडले 
काही दिवसांपुर्वी राखी सावंतने विदेशी महिला रेसलर रेबेलला चॅलेंज केले होते. पण तिला चॅलेंज देणे खुप महागात पडले, तिला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. हरियाणाच्या पंचकुलाच्या ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये CWE चा रेसलिंग प्रोग्राम ठेवण्यात आला होता. यामध्ये द ग्रेट खलीसोबतच अनेक मोठे रेसलर सहभागी होती. या दरम्यान इटरनॅशनल महिला रेसलर द रेबेलने रिंगमधून भारतीय महिलांना तिच्यासोबत फाइट करण्याचे आव्हान दिले होते. 
- रेबेलचे चॅलेंज ऐकल्यानंतर राखी उभी राहिली आणि डायरेक्ट रिंगमध्ये पोहोचली. तिने रेबेलला आपल्यासोबत डान्स करण्याचे आव्हान दिले. रेबेलने तिचे चॅलेंज स्विकारले आणि डान्स केला. पण म्यूझिक बंद होताच रेबेलने राखीला खांद्यावर उचलले आणि खाली आपटले. यामुळे राखी जखमी झाली. तिच्या कमरेला इजा झाली होती. तिला पंचकुलाच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

 

राखी म्हणाली आहे - मी रेबेलचा सूड घेईल 
- रेबेलचा मार खाल्ल्यानंतर राखी म्हणाली होती की - "माझ्यासोबत धोका झाला आहे. कारण मी फाइट करण्यासाठी नाही तर डान्स करण्यासाठी गेले होते. यामुळे मी चॅलेन्ज स्विकारले. मी फाइट करण्यासाठी गेले नव्हते. पण रेबेलने अचानक मला आपटले." राखी म्हणाली होती की, मी बरी झाल्यानंतर रेबेलला मारेल. या मारहाणी मागे कुणाचा प्लान असू शकतो अशी शंकाही राखीने व्यक्त केली होती. ती म्हणते की, यामागे अभिनेत्री तनुश्री दत्ताचा हात असू शकतो. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर सेक्शुअल हरॅशमेंटचे आरोप लावले होते तेव्हा राखीने तनुश्री खोटे बोलत असल्याचे सांगितले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...